Join us

एमी जॅक्सनने फॅन्सना दिली गोड बातमी; सोशल मीडियावर फोटो केला शेअर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 6:55 PM

ब्रिटीश ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. आता मात्र तिने एक गोड बातमी देत तिच्या फॅन्सना खुश केले आहे.

बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणून एमी जॅक्सन हिचे नाव घेतले जाते. ती बॉयफ्रेंड आणि ब्रिटिशचा मल्टी मिलेनियर जॉर्ज पानायियोटौ याच्यासोबत याचवर्षी ग्रीसमध्ये ती लग्न करणार होती. ब्रिटीश ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. आता मात्र तिने एक गोड बातमी देत तिच्या फॅन्सना खुश केले आहे. ती बातमी म्हणजे ती गरोदर असल्याचे सांगून तिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘मी ही बातमी खरंतर घराच्या गच्चीवरून तुम्हाला ओरडून सांगणार होते आणि आज तो दिवस आला. मी आज जो खुलासा करणार आहे त्यासाठी मी आजचा दिवस योग्य मानते. मी आत्तापासूनच तुझ्यावर खूप प्रेम करू लागले आहे. एवढं की, मी इतर कुणावरही इतकं प्रेम करत नाही. हेच खरंतर सर्वांत प्रामाणिक प्रेम असू शकतं. मला तुला भेटण्याची खूप उत्सुकता आहे.’ तुम्हाला माहित आहेच की, एमीने नवीन वर्षांच्या संध्येला बॉयफ्रेड जॉर्जसोबत तिने साखरपुडा केला होता. त्यावेळी ती दोन महिन्यांची प्रेगनंन्ट होती. एमीने तिच्या साखरपुड्याविषयी फॅन्सना सोशल मीडियावर सांगितले होते की,‘१ जानेवारी २०१९ पासून माझ्या नव्या आयुष्याला सुरूवात होणार आहे. आय लव्ह यू...खूप खूप धन्यवाद की, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता.’

तिचे लग्न आता पुढच्या वर्षी २०२० मध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. लग्न पुढे ढकलण्याचे कारणही थोडे आश्चर्यकारक आहे. लग्न करण्यासाठी सुंदर बीचच्या शोधात हे कपल आहे. जेव्हा दोघांना त्यांच्या आवडीनुसार बीच मिळेल तेव्हा ते लग्न करतील अशा चर्चा सुरू आहेत. जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लबही आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.

टॅग्स :एमी जॅक्सनलग्नप्रेग्नंसी