बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन लवकरच आई होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सगळीकडेच सुरू आहेत. याचे कारण म्हणजे, प्रेग्नंसीकाळातील बिनधास्त फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा तिने लावला आहे. आता तर एमीने चक्क बेबी बम्प फ्लॉन्ट करणारा टॉपलेस फोटो शेअर केला आहे. सोबत स्वत:चे हेल्थ अपडेटही दिले आहेत.प्रेग्नंसीच्या 33 व्या आठवड्यात शरीरात कुठले बदल झालेत, हे तिने सांगितले आहे. टॉपलेस या फोटोत एमीने एक मोठी हॅट घातली आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘ग्रीस? नाही. मी आणि माझ्या बाळाने संपूर्ण उन्हाळा बगिच्याच्या मागे काढला. त्याची एक झलक पाहण्याची प्रतीक्षा आहे. हा प्रेग्नंसीचा 33 वा आठवडा आहे. बम्प, स्ट्रेच मार्क, वेट गेन हे सगळे या काळात पाहायला मिळाले.’
जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लब आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.