Join us

​सलमान नाही तर ‘मल्टी मिलेनियर प्लेबॉय’च्या प्रेमात वेडी झालीयं एमी जॅक्सन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 10:24 AM

अभिनेत्री एमी जॅक्सन लवकरच मेगास्टार रजनीकांत व अक्षयकुमार स्टारर ‘२.०’ या चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटात एमीला जोरदार अ‍ॅक्शन ...

अभिनेत्री एमी जॅक्सन लवकरच मेगास्टार रजनीकांत व अक्षयकुमार स्टारर ‘२.०’ या चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटात एमीला जोरदार अ‍ॅक्शन करताना आपण पाहू शकणार आहोत. तूर्तास ‘२.०’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पण एमी मात्र या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच चर्चेत आहे. होय, एमी चर्चेत आहे ती, डेटींगच्या बातम्यांमुळे. एमीच्या आयुष्यात एका खास व्यक्तीने एन्ट्री घेतल्याची खबर आहे. तूर्तास त्याच्या व एमीच्या डेटींगच्या जोरदार चर्चा आहेत. मल्टी मिलेनियर प्ले बॉय जॉर्ज पानायिटूसोबत एमी रिलेशनशिपमध्ये असल्याचे कळतेय.  पॉप गायिका शेरिल कोलचा एक्स बॉयफ्रेन्ड अशीही एक जॉर्जची ओळख आहे. ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्स पानायिटूचा मुलगा असलेला जॉर्ज सध्या एमीसोबत क्वॉलिटी टाईम घालवतो आहे. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एमीने स्वत: जॉर्जसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.ALSO READ : पुन्हा एकदा रजनीकांत-अक्षय कुमारच्या ‘२.०’ रिलीज डेट पुढे ढकलली ?काही दिवसांपूर्वी एमी व जॉर्ज एका सुंदर लोकेशनवर सुट्टी एन्जॉय करताना दिसले होते. एकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. अर्थात २०१२ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते.   एमीने २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमात तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर एमी ‘सिंग इज ब्लिंग’, ‘फ्रीकी अली’ या सिनेमांमध्ये दिसली होती. त्याचबरोबर २०१६ मध्ये  तिने ‘देवी’ या साउथ सिनेमामध्येही काम केले होते.