अभिनेत्री एमी जॅक्सन(Amy Jackson)ने ब्रिटिश अभिनेता आणि संगीतकार एडवर्ड जॅक पीटर वेस्टविकसोबत लग्न केले आहे. एमी आणि एडवर्डचे इटलीतील अमाल्फी बीचवर डेस्टिनेशन वेडिंग होते. एमीचा ५ वर्षांचा मुलगा अँड्रियासही या लग्नात सहभागी झाला होता.
एमी आणि एडवर्डने लग्नाचे पहिले फोटो आपापल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. दोघांनी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले. या पोस्टमध्ये, वेस्टविकने लिहिले, "प्रवास नुकताच सुरू झाला आहे." या कॅप्शनमध्ये दोघांनी अंगठीवाली इमोजी देखील समाविष्ट केली आहे.
एमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविक दोघेही खूप सुंदर दिसत होते. लग्नासाठी एमीने पांढरा गाउन ड्रेस निवडला तर एडवर्डने काळ्या पॅन्टसह पांढरा सूट घातला. फोटोत ते दोघे पोझ देताना दिसत आहेत. या पोस्टवर कमेंट करून चाहते एमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविक यांचे अभिनंदन करत आहेत. एका यूजरने लिहिले, “तुम्ही दोघे एक सुंदर जोडपे आहात!! तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!” आणखी एका युजरने लिहिले, “तुम्हा दोघांना खूप प्रेम आणि खूप खूप अभिनंदन.” अनेक चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा आणि भरभरून प्रेम दिले.
एडवर्ड वेस्टविकशी लग्न करण्यापूर्वी एमी बिझनेसमन जॉर्ज पनायोटौसोबत रिलेशनशिपमध्ये होती. जानेवारी २०१९ मध्ये दोघांची एंगेजमेंट झाली. त्या दोघांना अँड्रियास जॅक पनायोटौ नावाचा मुलगा होता. जॉर्ज आणि एमी यांच्यात अनेक बाबींवर मतभेद होते, ज्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर एमीने एडवर्ड वेस्टविकला डेट करायला सुरुवात केली. २०२२ मध्ये त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. एडवर्ड वेस्टविक आणि एमी जॅक्सनने लग्नाआधी या वर्षी जानेवारीमध्ये एंगेजमेंट केली होती.