अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा अखेर 24 सप्टेंबर रोजी उदयपूर राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले. या गोड कपलचे लग्नातील फोटो कालच समोर आले. तर आता हळूहळू लग्नातील काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अलीकडेच, एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये परिणीतीचे वडील आणि राघव चढ्ढा यांच्यातील हृदयस्पर्शी नातं चाहत्यांना पाहायला मिळालं.
या व्हायरल व्हिडीओमध्ये परिणीतीचे वडील पवन चोप्रा हे लग्नाचे विधी करताना दिसत आहेत. ते मंडपात राघवसोबत बसलेले दिसतात. त्यांनी ऑफ व्हाइट आणि गोल्डन शेरवानी परिधान केलेली पाहायला मिळत आहे. हा क्षण पाहून चाहतेही भावूक झालेत.
परिणीतीच्या भावाने एक पोस्ट करत मेव्हण्याचं च्रोपा कुटुंबात स्वागत केलं होतं. त्याने लिहलं होत की, "काही गोष्टी, लोक अगदी योग्य वाटतात. काही क्षण आणि त्या भावना फार सुंदर असतात. चोप्रा आणि चड्डा यांच्यासाठी हे सर्व खुप छान होते. राघव चढ्ढा तुमचं चोप्रा कुटुंबाच्या क्रेझीनेसमध्ये स्वागत आहे. देखण्या तरुणाच्या शेजारी परिणीती खूपच सुंदर दिसतेय. तुम्हा दोघांना खूप प्रेम".
दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. तर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी परिणीती आणि राघव चड्ढा यांचं वेडिंग रिसेप्शन असणार आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूडसेलिब्रिटींबरोबर राजकीय मंडळीही उपस्थित असणार आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर परिणीती – राघव विवाहबंधनात अडकले आहेत.