Join us  

...अन् भर मंडपात शाहरुख अमिताभ-जया बच्चन यांच्या पडला पाया, अंबानींच्या सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 12:32 PM

अनंत-राधिकाच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पण, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याने...

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. १२ जुलैला मुंबईतील जिओ सेंटर येथे अनंत-राधिकाचं लग्न झालं. अनंत-राधिकाच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पण, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याने...

अनंत-राधिकाच्या लग्नाला शाहरुख खानने त्याच्या कुटुंबीयांसोबत हजेरी लावली होती. शाहरुख त्याची पत्नी गौरी, लेक सुहाना आणि मुलगा आर्यन खानसह उपस्थित होता. अंबानींच्या लेकाच्या लग्नाला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनीही हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्यातील बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यातील एक व्हिडिओ चर्चेत आला असून व्हिडिओ पाहून नेटकरी शाहरुखचं कौतुक करत आहेत. 

विरल भयानी या पापाराझी अकाऊंटवरुन अनंत-राधिकाच्या लग्नातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत भर मांडवात शाहरुख अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या पाया पडताना दिसत आहे. त्याची कृती पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. "म्हणूनच तो किंग आहे", "म्हणूनच म्हणतात की सगळेच SRK होऊ शकत नाही", "शाहरुख हा अनेकांसाठी प्रेरणा आहे", "खरा भारतीया आणि सनातनी" अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत.  

टॅग्स :शाहरुख खानअमिताभ बच्चनजया बच्चनसेलिब्रेटी वेडिंग