Join us

अंबानींच्या लग्नात पोहोचल्यावर शाहरुखला लागली गुजरातची हवा; गुजराती भाषेत बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:05 IST

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : अंबानींच्या सोहळ्यात किंग खानचं गुजराती; व्हिडिओ होतोय व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची चर्चा आहे. १ ते ३ मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी-राधिकाचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता या सोहळ्यातील किंग खानचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लेकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात तीनही खानची हवा पाहायला मिळाली. आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या डान्स परफॉर्मन्सने अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंगला चार चांद लावले. त्यांच्या प्री वेडिंगमध्ये किंग खानने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शाहरुख खान अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गुजरातीत बोलताना दिसत आहे. "जामनगर, तबीयत एकदम तबलातोड़ छे ने?" असं म्हणत तो उपस्थितांच्या तब्येतीची विचारपूस करताना व्हिडिओ पाहायला मिळत आहे. 

पुढे शाहरुख म्हणतो, "तम लोको ए जामी लिधू के नहीं? तम लोगो बाउ सारू लागे छे।". "पण, मी शाहरुख आहे त्यामुळे मला जामनगरमधील महिला जास्त सुंदर दिसत आहेत," असंही पुढे तो हिंदीत म्हणतो. 

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा पार पडला. आता अंबानींच्या घरी धाकट्या लेकाची लगीनघाई सुरू आहे. अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये बॉलिवूडबरोबरच हॉलिवूड सेलिब्रिटी आणि अनेक दिग्गरजांनी उपस्थिती दर्शविली होती. १२ जुलैला अनंत आणि राधिका लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :शाहरुख खानमुकेश अंबानीनीता अंबानी