Join us

"ही कोणती गायिका आहे?", अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाणं गायल्याने शिबानी दांडेकर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 3:07 PM

Anant Amabani-Radhika Merchant Pre Wedding : जावेद अख्तरांच्या सुनेने गायलं गाणं, शिबानी दांडेकरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा प्री वेडिंग सोहळा पार पडत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या या प्री वेडिंग सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित करण्यात आलं आहे. हॉलिवूड पॉप स्टार सिंगर रिहानाने या सोहळ्याला गाणं गाऊन चार चांद लावले. रिहानाबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री आणि फरहान अख्तरची पत्नी असलेल्या शिबानी दांडेकरनेही या सोहळ्यात गाणं गायलं. तिचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यातील रिहानाने गायलेलं गाणं नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं. तिचं सर्वत्र कौतुकही होत आहे. मात्र, अंबानींच्या लेकीच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाणं गायल्याने शिबानीला ट्रोल करण्यात आलं आहे. विरल भय्यानीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत शिबानी हिंदी गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी शिबानीला ट्रोल केलं आहे. "फ्लॉप सिंगर", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "माहौल बनवतेय की खराब करतेय", असं म्हटलं आहे. "ही कोणती सिंगर आहे", असंही म्हटलं आहे. 

दरम्यान, अनंत अंबानी-राधिका मर्चंटचं प्री वेडिंग फंक्शन १ ते ३ मार्च दरम्यान पार पडणार आहे. यासाठी अख्खं बॉलिवूड जामनगरमध्ये अवतरलं आहे. करीना कपूर, सैफ अली खान, कतरिना कैफ, विकी कौशल, रणवीर सिंग, दीपिका पादुकोन, आलिया भट, सोनम कपूर या कलाकारांनी हजेरी लावली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. 

टॅग्स :शिबानी दांडेकरमुकेश अंबानीनीता अंबानी