Join us

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा 'या' देशात पार पाडणार लग्न सोहळा, जाणून घ्या सर्व अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 14:54 IST

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं लग्न कुठे पार पडणार, याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.

नामवंत उद्योगपती मुकेश हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लेक अनंत अंबानी याचे प्री वेडिंग फंक्शन हे काही दिवसांपूर्वीच गुजरात येथे पार पडले. या फंक्शनला बाॅलिवूड कलाकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्री-वेडिंग फंक्शननंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं लग्न कुठे पार पडणार, याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. यातच आता अनंत आणि राधिकाच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले आहे. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या या विवाहसोहळ्याला जगभरातून लोक उपस्थित राहणार आहेत. ही जोडी जुलैमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे.  दोघे 12 जुलै 2024 रोजी लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अंबानी कुटुंबाकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी इंडिया टुडेनं अनंत-राधिकाचा विवाह सोहळा हा लंडन आणि संगीत हे थेट अबूधाबीत होणार असल्याचं सांगितलं होतं.  यातच आता अनंत आणि राधिकाचे लग्न परदेशात नाही, तर भारतात होणार असल्याचं समोर आलं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी इन्स्टाग्रामपेजवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार अनंत आणि राधिका हे  मुंबईतच लग्न करणार आहेत. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूडपासून ते परदेशातील पाहुणे उपस्थित राहणार आहेत. लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान, सलमान खान, बच्चन कुटुंब, विराट कोहली, अनुष्का शर्मा, विकी कौशल, कतरिना कैफसह अनेक बॉलिवूड स्टार्सची नावे आहेत. यासोबतच बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्झमन, बॉब इगर, इव्हांका ट्रम्प यांच्यासह अनेक परदेशी पाहुणे देखील लग्न सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी भारतात येऊ शकतात.

टॅग्स :अनंत अंबानीसेलिब्रिटीमुकेश अंबानीनीता अंबानी