Join us  

भारीच! लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याने होस्ट केला अनंत-राधिकाचा "शुभ आशीर्वाद" सोहळा, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:07 AM

लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याने अनंत-राधिकाचा "शुभ आशीर्वाद" सोहळा होस्ट केलाय.

Anant Ambani Wedding : देशाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा १२ जुलैला पार पडला. या शाही लग्नसोहळ्यानंतर १३ जुलैला 'शुभ आशीर्वाद' सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक दिग्गज मंडळी अनंत-राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते. हा सोहळा एका मराठमोळ्या अभिनेत्यानं होस्ट केला. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

अनंत-राधिकाच्या ''शुभ आशीर्वाद'' सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री, राज्यपाल रमेश बैस, द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू अशा अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. तसेच अनेक परदेशी पाहुणे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या-मोठ्या मान्यवरांसमोर  संपूर्ण सूत्रसंचालनाची जबाबादारी मराठमोळ्या शरद केळकरने पार पाडली.

'शुभ आशीर्वाद'' या समारंभातील काही Inside व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये शरद केळकर आपल्या भारदस्त आवाजात होस्टींग करताना दिसून येत आहे. यावेळी तो रॉयल लूकमध्ये दिसला. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  

आजवर शरद केळकरने मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. व्हॉइस ओव्हर क्षेत्रातही आज त्याने आपली छाप पाडली आहे. जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या ‘बाहुबली’ या चित्रपटातील प्रभासला हिंदीत आवाज शरद केळकरने दिला होता. याबरोबरच मार्वेलच्या 'गार्डीयन्स ऑफ गॅलक्सि’ आणि ‘मॅडमॅक्स फ्यूरी’सारख्या हॉलिवूडपटांच्या हिंदी डबिंगमध्येसुद्ध शरद केळकरने सहभाग घेतला होता.

टॅग्स :शरद केळकरसेलिब्रिटीबॉलिवूडमराठी अभिनेतासिनेमाअनंत अंबानीमुकेश अंबानीनरेंद्र मोदी