Join us  

अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 11:49 AM

Anant-Radhika's Sangeet Ceremony : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लवकरच अनंत राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे.

अनंत अंबानीं(Anant Ambani)च्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लवकरच अनंत राधिका मर्चंट(Radhika Marchant)सोबत लग्न करणार आहे. अंबानी कुटुंबातील हे शेवटचे लग्न आहे. त्यामुळे मुकेश आणि नीता अंबानी हे लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही आहेत. अलीकडेच एका संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला कलाकारांच्या परफॉर्मन्सने चारचाँद लावले आहेत.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंतच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. दोन ग्रँड प्री व्हेडिंगनंतर अनंत आणि राधिका आता मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत. पण हा शुभ मुहूर्त येण्याआधीच अंबानी कुटुंब प्रत्येक प्रकारचे विधी एखाद्या उत्सवाप्रमाणे सुंदरपणे साजरे करत आहेत. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सगळ्यामध्ये बर्थडे बॉय रणवीर सिंग आपल्या परफॉर्मन्सने लाइमलाइटमध्ये आला.

मुंबईतील जिओ सेंटरमध्ये होणाऱ्या लग्नाआधी NMACCमध्ये या जोडप्याची भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये रणवीर सिंग आणि सलमान खान जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करताना दिसले. याशिवाय 'कल्की 2898 एडी' अभिनेत्री दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अयान मुखर्जी, वरूण धवन आणि इतर अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

'नो एन्ट्री' गाण्यावर थिरकला रणवीररणवीर सिंगने 'नो एंट्री' चित्रपटातील 'इश्क दी गली' या लोकप्रिय गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स दिला. त्याचा डान्स कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. नेहमीप्रमाणे, रणवीरने फाटलेल्या जीन्स आणि पांढऱ्या टी-शर्टमधील त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सलमाननेही सोहळ्याला लावले चारचाँदअनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात सलमान खाननेही रंगत आणली. त्याने स्वॅगसह पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याच स्वॅगसह स्टेजवर परफॉर्म देखील केला. सलमानने अनंत अंबानीसोबत 'ऐसा पहली बार हुआ है...' गाण्यावर दमदार डान्स केला. 

टॅग्स :अनंत अंबानीरणवीर सिंगसलमान खान