Join us

"मला शाळेत चिडवायचे, हे फक्त माझ्याच सोबत होत असेल का?"; 'ही' अभिनेत्री बॉडी शेमिंगची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 16:10 IST

अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पण तुम्हाला माहित आहे का की, ती बॉडी शेमिंगची शिकार झाली होती. 

अभिनेत्री अनन्या पांडेने फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला. ती आज इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. अनन्या सतत काम करत असते. काही काळापूर्वी तिची 'कॉल मी बे' सीरिज रिलीज झाली होती, ज्याची खूप चर्चा आहे. अनन्याही तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पण तुम्हाला माहित आहे का की, अनन्या देखील बॉडी शेमिंगची शिकार झाली होती. 

अभिनेत्रीने स्वत:च याबाबत माहिती दिली होती. अनन्या म्हणाली, "मी लहान असताना मला शाळेत चिडवलं जायचं की मी फ्लॅट स्क्रीन आहे. हे फक्त माझ्याच सोबत होत असेल का? असा प्रश्न मला पडायचा. हे फक्त मलाच का सांगत आहेत? माझ्यात काही वाईट आहे का? मग जेव्हा मी मोठी होऊ लागले आणि इतर मुलींशी बोलले तेव्हा मला कळलं की, हे फक्त माझ्यासोबतच घडत नाही."

अनन्या पांडेने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर २ चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर ती 'पति पत्नी और वो'मध्ये दिसली होती. त्यांनी खाली पीली, गहराईयां, लायगर सारखे चित्रपट केले. रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये तिने कॅमिओ केला होता. 

अनन्या त्यानंतर ड्रीम गर्ल २, खो गए हम कहाँ मध्ये दिसली. आता अनन्या  CTRL आणि Shankara मध्ये दिसणार आहे. नुकतीच अनन्याची कॉल मी बे ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये तिने कियारा अडवाणीच्या लग्नाचं फुटेज रिक्रिएट केलं होतं. यामुळे अनन्याला ट्रोल केलं जात आहे. 

टॅग्स :अनन्या पांडेबॉलिवूड