Join us

वडील ठरले फ्लॉप पण लेक निघाली सुपरस्टार; केवळ ५ वर्षात दिला १०० कोटींचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:54 PM

ananya panday: ५ वर्षात काही मोजक्या सिनेमात झळकल्यानंतर तिला १०० कोटींमध्ये कमाई करणारा पहिला सिनेमा मिळाला आहे.

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सिनेमा दिले. मात्र, त्यांच्या अभिनयाची जादू फारशी प्रेक्षकांवर चालली नाही. त्यामुळे लोकप्रिय असून ते फ्लॉप अभिनेता ठरले. त्यांच्याच उलट त्यांची लेक मात्र, दिवसेंदिवस यशाच्या शिखराकडे वाटलाच करत आहे. अनन्याने केवळ ५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये १०० कोटींचा सिनेमा सिनेसृष्टीला दिला आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये तिची चर्चा रंगली आहे.

अनन्याने 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या सिनेमातून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती 'पति पत्नी और वो' या सिनेमात झळकली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.  त्यानंतर ती खालीपील, गेहराई आणि लिगर यांसारख्या सिनेमात झळकली. परंतु, म्हणावा तसा प्रतिसाद तिला मिळाला नाही. विशेष म्हणेज ५ वर्षात काही मोजक्या सिनेमात झळकल्यानंतर तिला १०० कोटींमध्ये कमाई करणारा पहिला सिनेमा मिळाला आहे.

आयुषमान खुराना याची मुख्य़ भूमिका असलेला ड्रीम गर्ल २ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात अनन्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाने नुकताच १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. याविषयी अनन्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे. 'धन्यवाद... 100 कोटी, अजूनही कलेक्शन सुरू आहे.,' असं कॅप्शन देत अनन्याने आयुषमानसोबत असलेलं सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे.  'माझे पहिले १०० कोटी, ड्रीम गर्ल 2 ला प्रेक्षकांचं किती मिळतंय हे या आकड्यांवरून सिद्ध होते. तुमच्या प्रेमाबद्दल मी सदैव ऋणी राहीन. हे शक्य करण्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार.' असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ड्रीम गर्ल २ हा सिनेमा २५ ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. या सिनेमाने १८ व्या दिवशी १०० कोटींच्या घरात कमाई केली आहे. त्यामुळे सध्या गदर २ या सिनेमासोबतच ड्रीम गर्ल २ चीही चर्चा होतीये.

टॅग्स :अनन्या पांडेआयुषमान खुराणाबॉलिवूड