Join us  

हार्दिक पांड्याला नाही या व्यक्तीला डेट करतेय अनन्या पांडे?, त्याचं अंबानी कुटुंबाशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 10:52 AM

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री क्रिकेटर हार्दिक पांड्या(Hardik Panday)ला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र ती हार्दिकच्या नाही तर दुसऱ्या एका व्यक्तीच्या प्रेमात असल्याचं बोललं जात आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री क्रिकेटर हार्दिक पांड्या(Hardik Pandya)ला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र ती हार्दिकच्या नाही तर दुसऱ्या एका व्यक्तीच्या प्रेमात असल्याचं बोललं जात आहे. अलिकडेच अनन्याचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात तिने AW नावाचा पेडेंट परिधान केला होता. 

अनन्या पांडे तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर या अभिनेत्रीचे नाव क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत जोडले जात होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात हे दोघे एकत्र दिसले होते. मात्र, आता अभिनेत्रीला तिचे नवे प्रेम सापडल्याचे दिसत आहे. वृत्तांनुसार, अभिनेत्री माजी मॉडेल वॉकर ब्लँको(Walker Blanco)ला डेट करत आहे.

एका क्रूझ पार्टीत भेटले दोघेइंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनदरम्यान क्रूझ पार्टीमध्ये अनन्या वॉकरला भेटली. याशिवाय अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर माजी मॉडेलला फॉलो करण्यासही सुरुवात केली आहे. दोघांचे लग्नात डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अनन्या वॉकरला क्रूझवर भेटली आणि दोघांमध्ये चांगले बॉण्डिंग निर्माण झाले. दोघेही एकमेकांना ओळखत आहेत आणि त्यांच्यात घट्ट मैत्री आहे. वॉकर हा जामनगरमध्ये राहतो आणि अंबानींसाठी वांतारा ॲनिमल पार्कमध्ये काम करतो. 

तिने पेंडेंट घातलेले दिसलेयाआधी अनन्याचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये तिने AW नावाचा पेंडेंट घातलेला दिसत होता. यानंतर चाहत्यांचा अंदाज होता की A म्हणजे अनन्या पण W म्हणजे कोण? असे दिसते की चाहत्यांना त्यांचे उत्तर मिळाले आहे.

वर्कफ्रंटअनन्या पांडे शेवटची खो गए हम कहाँ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ही अभिनेत्री सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत दिसली होती. याशिवाय तिची कॉल मी बे ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अनन्या पांडेहार्दिक पांड्या