Join us

"माझं ऐकलं नाही, तर VIDEO लीक करेन", आर्यन खाननं अनन्या पांडेला दिली होती धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 11:17 AM

 अनन्या पांडे हिनं आर्यन खानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

Ananya Panday On Aryan Khan  : बाॅलिवूडचे स्टार किड्स हे कायमच चर्चेत असतात. यामध्ये अनन्या पांडे, सुहाना खान, आर्यन खान, शनाया कपूर हे तर कायम सर्वांचं लक्ष वेधून घेतात. आता पुन्हा एकदा अनन्या पांडे आणि किंग खानचा लाडका लेक आर्यन खान यांची चर्चा रंगली आहेत. अनन्या पांडे हिनं आर्यन खानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.  "जर तू मी सांगीन ते केलं नाहीस, तर मी तुझे व्हिडीओ लीक करेल", अशी धमकी आर्यन खान दिल्याचं अनन्याने सांगितलं. 

नेटफ्लिक्सनं एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला आहे. ज्यात अनन्या पांडेनं आणि CTRL चे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी, कॉमेडियन तन्मय भट्ट हे गप्पा मारताना पाहायला मिळतेय. यावेळी अनन्या पांडेनं खुलासा केला की, "पूर्वी मी माझे स्वतःचे दैनंदिन व्लॉग बनवत असे. यामध्ये मी काय खाते, काय करते याचे व्हिडीओ बनवायची.  पण, मी कधीच ते शेअर केले नाहीत".

अनन्या म्हणाली,  "तेव्हा नुकतेच ॲपलवर फोटोबूथ आले होते. मी, सुहाना आणि शनाया आमची सर्व दिनचर्या रेकॉर्ड करायचो.  तर आर्यननं आम्हाला धमकावलं होतं की जर आम्ही त्याच्यासाठी काम केलं नाही तर, तो आमचे सर्व खाजगी व्लॉग आणि सर्व व्हिडीओ लीक करेल". 

अनन्या पांडे आणि आर्यन खान हे बालपणीचे मित्र आहेत. ती, सुहाना आणि शनाया एकत्र लहानाचे मोठे झाले आहेत. अनन्याचे वडील चंकी पांडे हे आर्यनचे वडील शाहरुखचे चांगले मित्र आहेत. शाहरुखने चंकी पांडेला कठीण काळात खूप मदत केली होती.  अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा CTRL हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाला आहे. विक्रमादित्य मोटवणे दिग्दर्शित या सिनेमात तिने नेला अवस्थीची भूमिका साकारली आहे. तिच्या या भुमिकेचं भरभरुन कौतुकही झालं. 

 

टॅग्स :अनन्या पांडेआर्यन खानसुहाना खानशाहरुख खान