बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स स्वत:चं नशीब आजमावत आहेत. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सुहाना खान अशा एकानंतर एक अभिनेत्री येत आहेत. अनन्या पांडे (Ananya Panday) आता इंडस्ट्रीत चांगलीच सरावली आहे. सुरुवातीला ट्रोलिंग झालं पण आता तिच्या कामाचं कौतुकही होत आहे. दरम्यान नुकतंच तिने इंडस्ट्रीत अभिनेत्यांना मिळणाऱ्या जादा मानधनावर भाष्य केलं.
अनेक अभिनेत्री मानधनाबाबतीत समानता असावी यावर बोलताना दिसतात. मात्र तरी अभिनेते अभिनेत्रींपेक्षा जास्त कमाई करतात. एका मुलाखतीत अनन्या पांडे म्हणाली, "मला आधी अभिनेत्यांच्या मानधनाबाबतीत कल्पनाच नव्हती. पण कधी कधी मी आकडे ऐकल्यावर चकितच व्हायचे. जेव्हा महिला-पुरुष असा फरक करुन असमानता दिसते तेव्हा वाटतं की पुरुषांना आजही विशेषाधिकार आहे. पुरुषांना मोठी खोली किंवा आलिशान कार दिली जाते. अभिनेत्याच्या मानाखातर हे केलं जातं. अभिनेत्रींनासोबतही असाच व्यवहार असायला हवा. मी याविरोधात खंबीरपणे उभी आहे."
ती पुढे म्हणाली, "अभिनेत्यांना जसा सम्मान मिळतो तसाच सम्मान अभिनेत्रींनाही दिला पाहिजे. जर याचा अर्थ बदल करणं आणि सत्यासाठी उभं राहणं असेल तर मी बॉसी च्या रुपात ओळखली जाण्यासाठी तयार आहे."
अनन्या पांडे नुकतीच 'कॉल मी बे' सीरिजमध्ये दिसली. याचा आता दुसरा सीजनही येणार आहे. तसंच तिचा 'CTRL' हा सिनेमाही रिलीज झाला. आता ती लक्ष्यसोबत धर्मा प्रोडक्शनच्या 'चाँद मेरा दिल' सिनेमात दिसणार आहे. अनन्या तरुणांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे.त