Join us

Liger : कोई ऑस्कर दो इन्हें..., ‘लाइगर’मधील अनन्या पांडेची अ‍ॅक्टिंग पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 3:21 PM

Ananya Panday : अनन्या पांडेला ऑस्कर द्या असं म्हणत नेटकरी ‘लाइगर’ चित्रपटाची खिल्ली उडवत आहेत. सोशल मीडियावर मीम्सचा जणू पूर आला आहे...

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड स्टार अनन्या पांडेचा (Ananya Panday ) ‘लाइगर’ (Liger) हा सिनेमा काल गुरूवारी प्रदर्शित झाला. आता सिनेमा रिलीज झाल्यावर, सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटणारच. काही प्रेक्षकांना हा सिनेमा चांगलाच आवडला. काहींनी मात्र हा सिनेमा पाहून नाकं मुरडली. अनेकांना विजय आणि अनन्या पांडेची जोडीही आवडली नाही. मग काय, सोशल मीडियावर मीम्सचा जणू पूर आला. विशेषत: ‘लाइगर’ रिलीज झाल्यानंतर अनन्या पांडे जबरदस्त ट्रोल होतेय. चित्रपटातील तिच्या अभिनयाची जोरदार खिल्ली उडवली जातेय. ‘हिला ऑस्कर द्या रे,’ अशी उपरोधिक मागणी करत, अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे.

‘लाइगर’मधील एक सीन शेअर करत, अनेकांनी अनन्याला ट्रोल केलं आहे. या सीनमध्ये विजय देवरकोंडा आपलं प्रेम व्यक्त करतो. सीन गंभीर आहे. पण या सीनमध्ये अनन्याच्या चेहऱ्यावरचे नकली भाव पाहून प्रेक्षकांनी तिची मजा घेतली आहे. ‘लाइगर’मधील अनन्याच्या एक्सप्रेशनपेक्षा चांगले एक्सप्रेशन माझा टूथब्रथ देईल, अशा शब्दांत लोकांनी तिची मजा घेतली आहे.

 ‘लाइगर’मध्ये अनन्याला कास्ट करणे सर्वात चुकीचा निर्णय होता, असं मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

याला काय म्हणून ओव्हर अ‍ॅक्टिंग, नो अ‍ॅक्टिंग की अ‍ॅक्टिंगमध्ये स्ट्रगल, अशी मजेशीर कमेंट एका चाहत्याने केली आहे.

अनन्या जीभेने नाकाला स्पर्श करते, तिचं हे टॅलेंटही लोकांना यानिमित्ताने आठवलं. यावरूनही तिला ट्रोल केलं गेलं.

अनन्या हिरोईन मटेरियल नाही, अशी प्रतिक्रिया अनेक युजर्सनी दिली. अनन्याची अ‍ॅक्टिंग म्हणजे टॉर्चर असल्याचं एका युजरने म्हटलं.

लाइगर’चं देशभर जबरदस्त प्रमोशन झालं होतं. विजय देवरकोंडाने प्रमोशनचा धडाका लावला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात अ‍ॅडव्हान्स बुकिंग झालं होतं. पण चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. ट्विटरवर प्रेक्षकांनी या चित्रपटावर निगेटीव्ह रिव्ह्यू दिले आहेत. मात्र याऊपर अ‍ॅडव्हान्स बुकिंगमुळे ‘लाइगर’ला ग्रँड ओपनिंग मिळाली. पण दुपारच्या शोमध्ये निगेटीव्ह रिव्ह्यूचा परिणाम स्पष्टपणे जाणवला.  त्यामुळे पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवरून विजय देवरकोंडा बॉलिवूडवर राज्य करेल असं म्हणता येणार नाही. चित्रपटाला प्रचंड नकारात्मक प्रतिकिया मिळत आहेत. त्यामुळे चित्रपटाची कमाई पुढे वेग घेणार की मंदावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :अनन्या पांडेविजय देवरकोंडाबॉलिवूड