Join us  

अनन्या पांडेचं ठरलं? गळ्यातील 'AW' अक्षराच्या लॉकेटने वेधलं लक्ष; सोशल मीडियावर रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 3:54 PM

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. अनन्याला आपण आजवर विविध भूमिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. अनन्याने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत तिची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. सिनेमांसोबतच अनन्या ही तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर अनन्याचं नाव क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत जोडलं गेलं होतं. यातच आता अनन्याने तिच्या गळ्यात एक विशेष पेंडेंट घालून अफेअरच्या चर्चांना खतपाणी घातलं आहे. 

अनन्या नुकतंच मुंबईतत स्पॉट झाली. यावेळी ती कॅज्युअल आउटफिट्समध्ये खूपच क्यूट दिसत होती. मात्र, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिच्या खास नेकलेसने. ज्यामध्ये गळ्यात घातलेले 'AW' अक्षर असलेले पेंडेंट चमकताना दिसून आलं. यातील 'A' म्हणजे अनन्या. पण 'W' चा अर्थ चाहत्यांना लागत नाहीये. काही नेटकऱ्यांनी तिला या पेंडेंटचं नेमकं गुपित काय? असे प्रश्न विचारले आहेत. 'AW' अक्षर असलेला नेकलेस परिधान करुन अनन्याने तिच्या लव्ह लाईफबद्दल चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे.

अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती आगामी काळात 'शंकरा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आर माधवन आणि अक्षय कुमारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक बायोपिक चित्रपट आहे, ज्याची कथा 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित असेल. याशिवाय अनन्याची  'Call Me Bae' ही सीरिज येत्या 6 सप्टेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित केली जाणार आहे. अनन्या पांडे व्यतिरिक्त या सीरिजमधअये वीर दास, गुरफतेह परिजादा, वरुण सूद, विहान सामत, मुस्कान जाफरी असे अनेक स्टार्स झळकणार आहेत. 

टॅग्स :अनन्या पांडेसेलिब्रिटीबॉलिवूडहार्दिक पांड्याआदित्य रॉय कपूर