Join us  

२५ वर्षीय अनन्या पांडेची मोठी मजल! स्वतःसाठी खरेदी केली आलिशान कार; किंमत कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 12:16 PM

अनन्या पांडेने आलिशान लक्झरी गाडी खरेदी केलीय. अनन्या पांडेच्या गाडीची किंमत तब्बल (anannya pandey)

अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. अनन्याला आपण आजवर विविध भूमिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. अनन्याने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत तिची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. 'पती, पत्नी और वो', 'गेहराईया', 'स्टूडंट ऑफ द इयर', 'ड्रीम गर्ल २' अशा विविध सिनेमांमधून अनन्याने अभिनय केलाय. अनन्या नुकतीच एका खास कारणाने चर्चेत आलीय. ते कारण म्हणजे अनन्याने स्वतःसाठी महागडी कार खरेदी केलीय. 

अनन्याने खरेदी केली महागडी कार

अनन्याने पांढऱ्या रंगाची रेंज रोव्हर कार खरेदी केलीय. अनन्या नव्या गाडीसोबत बांद्राला स्पॉट झाली. नव्या गाडीवर फुलांचा हार घालण्यात आला होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. चाहत्यांनी अनन्याचा हा व्हिडीओ शेअर करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. अनन्याच्या गाडीच्या नंबर प्लेटनेही सर्वांचं लक्ष वेधलंय. ३००० असा अनन्याच्या गाडीचा नंबर आहे. हा एक VIP नंबर आहे.

अनन्याच्या कारची किंमत ऐकून थक्क व्हाल

अनन्या पांडेच्या आलिशान रेंज रोव्हर गाडीची किंमत तब्बल ३ कोटींच्या घरात आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी अनन्याने मेहनतीच्या जोरावर ही महागडी गाडी खरेदी केलीय. अनन्या कार घेताना कॅज्युअल अंदाजात पाहायला मिळासी. अनन्याच्या  वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतीच ती 'बॅड न्यूज' या सिनेमात पाहायला मिळतेय. या सिनेमात अनन्या तृप्ती डिमरीसोबत विशेष भूमिकेत झळकतेय. 

टॅग्स :अनन्या पांडेबॉलिवूड