Join us

आदित्य रॉय कपूरबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अनन्याने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 6:00 PM

Koffee With Karan 8 : अनन्याने नुकतीच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ८'मध्ये हजेरी लावली होती. आदित्य रॉय कपूरबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अनन्यानेही मौन सोडलं आहे.

स्टारकिड अनन्या पांडे आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. २०१९ साली अनन्याने 'स्टुडंट ऑफ द इयर २' या करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अनन्या ही प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेल्या अनन्याने 'पती पत्नी और वो', 'खाली पिली', 'गेहराइया', 'लायगर', 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटांत काम केलं आहे. बॉलिवूडमधील करिअरमध्ये अनन्याचं नाव काही अभिनेत्यांबरोबर जोडलं गेलं. पण, गेल्या काही दिवसांपासून अनन्या आणि आदित्य रॉय कपूरच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. 

अनन्याने नुकतीच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ८'मध्ये हजेरी लावली होती. अनन्याबरोबर अभिनेत्री सारा अली खानही सहभागी झाली होती. साराने या शोमध्ये अनन्याची पोलखोल केली होती. "अनन्याकडे नाईट मॅनेजर आहे," असं ती म्हणाली होती. आता आदित्य रॉय कपूरबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अनन्यानेही मौन सोडलं आहे."आपल्या नात्याला नाकारणं हे आधीच्या सीझनसारखं नाही का", असं करणने अनन्याला विचारलं होतं. 

अनन्या म्हणाली, "रिलेशनशिपला नाकारलं पाहिजे किंवा स्वीकारलं पाहिजे याबाबत मी भाष्य करणार नाही. ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटतात. त्याच तुम्ही केल्या पाहिजेत. काही गोष्टी खासगी आहेत आणि त्या तशाच ठेवल्या पाहिजेत." यापुढे करणने अनन्याला विचारलं, "आदित्य रॉय कपूरने तुला फ्रेंडझोन केलं आहे का? की यापेक्षा काही जास्त आहे?" 

यावर अनन्या म्हणाली, "आम्ही दोघे चांगले मित्र आहोत."प्यार ही दोस्ती है" असं करणने म्हटल्यावर अनन्या लाजलेली दिसली. ती पुढे म्हणाली, "आम्ही फक्त बेस्ट फ्रेंड्स आहोत". आदित्य रॉय कपूरबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल अनन्याने थेट बोलणं टाळलं असलं तरी पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.  

टॅग्स :अनन्या पांडेआदित्य रॉय कपूर