Join us

आलिया भटसोबत होतेय अनन्या पांडेची तुलना, चाहत्यांचं प्रेम पाहून म्हणाली, "अभिनेत्री म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 10:45 IST

एका मुलाखतीत अनन्याने आलिया भटसोबत होणाऱ्या तुलनेवर प्रतिक्रिया दिली.

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या ओटीटीवरील बॅक टू बॅक रिलीजमुळे प्रकाशझोतात आहे. नुकतीच तिची 'कॉल मी बे' सीरिज प्रदर्शित झाली. सीरिजची संकल्पना आणि अनन्याचं काम दोन्ही प्रेक्षकांना आवडलं. तर आता तिचा CTRL हा सायबर थ्रिलर सिनेमा ओटीटीवरच प्रदर्शित होत आहे. यानिमित्त अनन्या मुलाखती देत आहे. एका मुलाखतीत तिने आलिया भटसोबत होणाऱ्या तुलनेवर प्रतिक्रिया दिली.

आलिया भट सध्याच्या पिढीतली सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. आलियाने तिचं प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्य खूप छान सांभाळलं आहे. तिने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले शिवाय वैयक्तिक आयुष्यात लग्न करुन तिला एक मुलगीही झाली. अनन्या, जान्हवी, सारा  या नवोदित अभिनेत्री तिच्याकडून प्रेरणा घेतात. अनन्या पांडेचे चाहते तिला नेक्स्ट आलिया भट असं म्हणतात. या तुलनेवर अनन्या म्हणाली, "नाही. आलिया खूपच चांगली अभिनेत्री आहे. माझे चाहते असं म्हणतात ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण मी आलियाने ज्याप्रकारे काम केलंय तसं मी करु शकेन का माहित नाही."

CTRL सिनेमाचे निर्माता विक्रमादित्य मोटवानी अनन्याची बाजू घेत म्हणाले, "अनन्या नेपो किड आहे असं बोललं जातं. नेपो किड म्हणजे ज्यांचे आईवडील त्याच इंडस्ट्रीत आहेत. पण जर तुम्हाला कामच जमत नाही, तुमच्यात टॅलेंट नाही, तुम्ही मेहनत करत नाही तर मग याचा काहीच उपयोग नाही."

अनन्या पांडेचा CTRL सिनेमा ४ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. यात ती विहान सामतसोबत दिसत आहे.  याआधी तिची 'कॉल मी बे' सीरिजही गाजली. 

टॅग्स :अनन्या पांडेआलिया भटबॉलिवूड