'प्यार दोस्ती है...' कुछ कुछ होता है या चित्रपटातील शाहरुख खानचा हा डायलॉग तुम्हाला आठवत असेल ना. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिने २६ वर्षांनंतर सांगितले आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूर(Aditya Roy Kapoor) सोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. त्यांच्या नात्याचा खुलासा करत तिने शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये चाहत्यांना गोंधळात टाकणारा इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.
नुकतीच अनन्या पांडेनेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा शोच्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. या शोमध्ये नेहासह अभिनेत्रीने आशिकी २ अभिनेता आदित्यसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. शोच्या प्रोमोमध्ये नेहाने अनन्याला तिच्या आणि आदित्यच्या नात्याबद्दल विचारल्याचे पाहायला मिळाले. यावर प्रतिक्रिया देताना अनन्या म्हणाली की 'आम्ही दोघे फक्त मित्र नाही तर खूप चांगले मित्र आहोत'.
यासोबतच नेहाने अनन्याला क्रिती सेनॉनच्या दिवाळी पार्टीत काढलेल्या फोटोबद्दल विचारले. यावर डिप्लोमॅटिक उत्तर देताना अनन्याने नेहाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाली की, 'आम्ही खूप चांगले मित्र आहोत, मला वाटत नाही की यापेक्षा जास्त काही बोलावे'. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर अनेकदा एअरपोर्टवर आणि व्हॅकेशन्सला एकत्र स्पॉट झाले आहेत. कपल्स अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, आतापर्यंत या जोडप्याने त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
ही जोडी झळकणार करण जोहरच्या सिनेमातशोमध्ये चाहत्यांना हिंट देताना करण जोहर म्हणाला की, लवकरच अनन्या आणि आदित्य मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. नेहा धुपिया अनेकदा तिच्या नो फिल्टर नेहा शोमध्ये बॉलिवूड स्टार्सना आमंत्रित करते आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित रहस्ये चाहत्यांशी शेअर करते. इतकेच नाही तर चाहत्यांनी विचारलेले प्रश्नही नेहा सेटवर आलेल्या स्टार्सना कमेंटमध्ये विचारते. नेहाचा हा शो OTT प्लॅटफॉर्म Jio TV वर प्रसारीत होतो.