स्टारकिड अनन्या पांडेबॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सुप्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची अनन्या मुलगी आहे. घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या अनन्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक चित्रपटांत ती मुख्य भूमिका साकारताना दिसली. बॉलिवूडमधील करिअरबरोबर अनन्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकतेच तिने पहिल्या पगारातून काय केले, याचा खुलासा केला.
अनन्या पांडेने आगामी चित्रपट 'खो गये हम कहाँ' ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळी अनन्या पांडेला पहिल्या पगारातून काय केले असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'पहिल्या पगारातून मी बहीण रायसा पांडेची ट्यूशन फी भरली होती. कारण मला नेहमी रायसाच्या शिक्षणात हातभार लावायचा होता'.
अनन्याचा 'खो गये हम कहाँ' हा चित्रपट २६ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अर्जुन वारिन सिंग यांनी केले आहे. अनन्यासह या सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवही यांच्याही भुमिका आहे. या सिनेमात तीन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. शिवाय, अभिनेत्री कल्की कोचलिन या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे.
अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती 'ड्रिम गर्ल २' चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत झळकली होती. शिवाय, अनन्या पांडे ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. इतकेच नाही तर मुंबईमध्ये अनेकदा हे दोघे एकसोबत स्पाॅट झाले आहेत.