Join us

बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:37 IST

अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले.

अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Pandey)  काही दिवसांपूर्वीच एका फंक्शनमध्ये आईचा २१ वर्ष जुना ड्रेस परिधान केला होता. अनन्याचे याचे फोटोही शेअर केले होते. चिंतामणी रंगाच्या या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. अनन्याची बहीण दीयाच्या लग्नात अनन्याने हा ड्रेस घातला होता. पण इतका जुना ड्रेस परिधान करण्याचं नक्की काय कारण होतं माहितीये का?

अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले. मैत्रिणीसाठी खास पोस्ट शेअर करत तिने लिहिले, "नवरी...माझी बहीण लग्न करत आहे याचा आनंदच आहे पण तरी मी तिला सोडायला तयार नाही. मात्र मला एक भाऊ मिळत आहे याचाही आनंद आहे. तसंच मी माझ्या आईचा २१ वर्ष जुना डिझायनर रोहित बाल यांनी डिझाईन केलेला ड्रेस घातला आहे."

अनन्याने पोस्टमध्ये उल्लेख केलेले डिझायनर रोहित बाल हे भारतातील प्रसिद्ध डिझायनर आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचं दिल्लीत निधन झालं. वयाच्या ६३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. रोहित बाल यांच्या शेवटच्या फॅशन शोमध्ये अनन्या पांडेच शोस्टॉपर होती.

अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिची 'कॉल मी बे' ही सीरिज काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली. यातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे. तर दुसरीकडे तिचा 'कंट्रोल' हा सिनेमाही ओटीटीवर आला. यामध्येही तिने लक्ष वेधून घेतलं. अनन्या करण जोहरच्या आगामी 'चाँद मेरा दिल' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत 'किल' फेम लक्ष्य लालवानी झळकणार आहे.  

टॅग्स :अनन्या पांडेबॉलिवूडसोशल मीडिया