- अन् फरहान अख्तरने बघितले २० भोजपुरी सिनेमे!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2017 5:39 AM
फरहान अख्तर एक मुरलेला अभिनेता आहे. चित्रपटातील भूमिकेत जीव ओतण्यासाठी फरहान प्रचंड मेहनत घेतो. आता ‘लखनौ सेंट्रल’ या चित्रपटाचेच ...
फरहान अख्तर एक मुरलेला अभिनेता आहे. चित्रपटातील भूमिकेत जीव ओतण्यासाठी फरहान प्रचंड मेहनत घेतो. आता ‘लखनौ सेंट्रल’ या चित्रपटाचेच घ्या ना. या चित्रपटासाठी फरहानने काय काय नाही केले. या चित्रपटात फरहान एका महत्त्वाकांक्षी भोजपुरी गायकाची भूमिका साकारतो आहे. या चित्रपटात त्याला भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी याचा चाहताही दाखवण्यात आले आहे. मग काय, फरहानने ही भूमिका अगदी कोळून प्यायचे ठरवले आणि तब्बल २० भोजपुरी चित्रपट पाहून टाकले. होय, स्वत:ची भोजपुरी व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी त्याने मनोज तिवारी आणि रवि किशन यांचे २० भोजपुरी सिनेमे पाहिले. यात ‘बांके बिहारी विधायक’, ‘धमल कायला राजा’, ‘हमर देवदास’ आणि ‘ससुरा बाडा पैसावाला’ अशा सिनेमांचा समावेश आहे. शूटींग सुरु होण्याच्या आठवभरापूर्वीपासून फरहानने भोजपुरी सिनेमा पाहण्याचा सपाटा लावला. अर्थात यामुळे त्याला त्याचा सर्वोत्कृष्ट शॉट देण्यात मदत झाली.‘लखनौ सेंट्रल’ टीमने मुंबईतील शूटींग पूर्ण केले आहे. यानंतर लखनौमध्ये चित्रपटाच्या दुसºया टप्प्याच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. निखिल आडवाणी निर्मित आणि रणजित तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात फरहानसोबत दिसणार आहे ती डायना पेन्टी. ALSO READ : फरहान अख्तर आणि अधुना भाबनी अख्तर यांचा सुपर फ्रेंडली घटस्फोटफरहान गेल्या अनेक दिवसांपासून एका हिटची आस लावून बसला आहे. त्याचे यापूर्वीचे ‘वजीर’,‘रॉक आॅन २’ हे चित्रपट फारशी कमाई करू शकलेले नाहीत. ‘भाग मिल्खा भाग’ हा त्याचा पहिला यशस्वी चित्रपट. जगविख्यात धावपटू मिल्खा सिंग यांची भूमिका त्याने निभावली होती. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. आता ‘लखनौ सेंट्रल’ फरहानच्या करिअरला कसे वळण देतो, ते बघूयात!