लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: परखड मतांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणावतची नवीन विधेयकाबाबत गैरसमजातून केलेल्या पोस्टमुळे फजिती झाली. चूक लक्षात आल्यानंतर तीने ही पोस्ट मागे घेतली. नोकरभरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने नुकतेच अॅण्टीचीटिंग विधेयक लोकसभेत मंजूर केले. तथापि, हे विधेयक नातेसंबंधातील फसवणुकीशी संबंधित असल्याचे कंगनाला वाटले. त्यामुळे त्यावर सोशल मीडियावर व्यक्त होताना तिने पोस्ट केली. त्यावरून तिला अनेकांनी ट्रोल केले.
जवळीक साधण्यासाठी एक निश्चित वय असावेमी सरकारला विनंती करते की, कोणताही पुरुष एखाद्या महिलेला प्रदीर्घ काळ डेट केल्यानंतर सोडू शकत नाही, जर त्याने असे केले तर त्याला महिलेला देखभाल भत्ता द्यावा लागेल. बहुपत्नीत्वावरही बंदी घातली पाहिजे, तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी लैंगिक संबंधांवर बंदी असावी, जवळीक साधण्याचे वय लग्नाच्या वयाप्रमाणेच असावे (१८/२१), मोठ्या शहरांतील शाळांमध्ये बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असणे हाही संस्कृतीचा भाग बनला आहे. त्यावर बंदी घातली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासात व्यत्यय येतो, असे कंगनाने म्हटले होते.
चूक लक्षात येताच पोस्ट डिलीटकंगनाने या विधेयकाबाबतचे एक विडचनात्मक वृत्त शेअर करत 'किशोरवयीन मुलांना लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यापासून रोखले पाहिजे', असेही सांगितले. नंतर या विधेयकाबाबत आपला गैरसमज झाल्याचे लक्षात येताच तिने ही पोस्ट डिलीट केली. मात्र, तोपर्यंत बराच हलकल्लोळ झाला, यावरून अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले.