Join us

...अन् माधुरीबरोबर किसिंग सीन देताना अभिनेत्याने ओठांचा घेतलेला चावा, नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 16:10 IST

Madhuri Dixit Kissing Scene : माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांचा दयावान चित्रपट खूप चर्चेत होता. या चित्रपटात विनोद आणि माधुरीमध्ये अनेक इंटिमेट सीन्स होते. त्यांच्या किसिंग सीनची बरीच चर्चा झाली होती.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा 'दयावान' (Dayavan Movie) चित्रपट खूप चर्चेत होता. या चित्रपटात विनोद आणि माधुरीमध्ये अनेक इंटिमेट सीन्स होते. त्यांच्या किसिंग सीनची बरीच चर्चा झाली होती. इंटिमेट सीन दरम्यान विनोद खन्ना यांचा त्यांच्यावरील नियंत्रण सुटले होते.

इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार, दयावान चित्रपटातील लोकप्रिय किसिंग सीनमध्ये विनोद खन्ना थोडेसे अनियंत्रित झाले होते. हा किसिंग सीन थोडा मोठा होता. विनोद खन्ना यांनी नॉर्मल लिपलॉक करण्याऐवजी माधुरीचे ओठ चावल्याच्या बातम्या आल्या आहेत. माधुरी आणि विनोदलाही इंटिमेट सीनमुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

माधुरीला मिळालेलं इतकं मानधनदयावान या चित्रपटातील आज फिर तुमपे प्यार आया है हे गाणे खूप आवडले होते. या गाण्यात माधुरी आणि विनोदने बोल्ड सीन्स दिले होते. माधुरी दीक्षितला या चित्रपटासाठी १ कोटी रुपये मानधन देण्यात आल्याचे वृत्त आहे. चित्रपटाच्या या दृश्याबाबत माधुरीने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला असे वाटते की मी 'नाही, मला हे करायचे नाही' असे म्हणायला हवे होते. कदाचित तो सीन करताना मी थोडी घाबरले होते. असे होते की, मी एक अभिनेत्री आहे आणि दिग्दर्शकाने त्या दृश्याची एक प्रकारे कल्पना केली होती. त्यामुळेच मी ते केले नसते तर कथानक बिघडले असते. दयावान या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो फिरोज खान यांनी दिग्दर्शित केला होता.

वर्कफ्रंट

माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आता 'भूल भुलैया ३' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि विद्या बालन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :माधुरी दिक्षितविनोद खन्ना