Join us

आमिर-सलमानच्या 'अंदाज अपना अपना'चा ट्रेलर भेटीला, 'या' तारखेला पुन्हा रिलीज होतोय सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 14:32 IST

Andaz Apna Apna Re-release Date: 'अंदाज अपना अपना' सिनेमा पुन्हा रिलीज होणार असून त्याची तारीख समोर आलीय (andaz apna apna)

'अंदाज अपना अपना' (Andaz Apna Apna) सिनेमा १९९४ साली रिलीज झाला. आमिर खान (aamir khan) आणि सलमान खान (salman khan) या कलाकार जोडीचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आजही हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. आमिर आणि सलमानच्या विनोदाचा टायमिंग या सिनेमात सर्वांना आवडला. अशातच 'अंदाज अपना अपना'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. 'अंदाज अपना अपना' सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. इतकंच नव्हे तर 'अंदाज अपना अपना' सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झालाय. 

'अंदाज अपना अपना'चा ट्रेलर

आमिर खान फिल्म प्रॉडक्शनने सोशल मीडियाच्या माध्यमातून या सिनेमाच्या ट्रेलरची घोषणा केली आहे. 'अंदाज अपना अपना'चा ट्रेलर खळखळून हसवणारा आहे. या सिनेमात पुन्हा एकदा अमर-प्रेम या दोघांची मैत्री याशिवाय तेजा, बजाज, क्राइम मास्टर गोगो, रवीना-करिश्मा असे अनेक कॅरेक्टर्स पुन्हा एकदा दिसत आहेत. हा ट्रेलर पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर स्माईल येईल यात शंका नाही. 'अंदाज अपना अपना'च्या ट्रेलरसोबत सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

या तारखेला रिलीज होणार 'अंदाज अपना अपना'

'अंदाज अपना अपना' सिनेमा २५ एप्रिल २०२५ ला रिलीज होणार आहे. आमिर खान, सलमान खान या दोघांची सिनेमात प्रमुख भूमिका असून सिनेमात परेश रावल, रवीना टंडन, करिश्मा कपूर, शक्ती कपूर, विजू खोटे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा चांगलाच गाजला. राजकुमार संतोषी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.हा सिनेमा आजही कल्ट क्लासिक कॉमेडी सिनेमा म्हणून ओळखला जातो.

टॅग्स :आमिर खानसलमान खानशक्ती कपूरबॉलिवूडरवीना टंडनकरिश्मा कपूरपरेश रावल