जगभर कोरोनाने थैमान सुरु आहे. देशात कोरोना संक्रमितांची संख्या घटली असली तरी अद्याप धोका कायम आहे. त्यामुळे सरकारकडून सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुचविण्यात येत आहेत. सरकारबरोबरच अनेक सेलिब्रिटी लोकांमध्ये कोरोनाबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अमिताभ बच्चन यापैकीच एक. सध्या कोणालाही कॉल करा, प्रथम अमिताभ यांची कॉलर ट्यून ऐकायला येते. कोरोनाबाबत निष्काळजीपणा महागात पडू शकतो, असे ते या ऑडिओ क्लिपमध्ये सांगतात. उद्देश चांगला आहे. पण अमिताभ यांच्या कॉलर ट्यूनने अनेकजण वैतागले आहे. अशात एका ‘सीआरपीएफ’ जवानाने थेट कस्टमर केअरलाच फोन केला. अमिताभ मला सल्ला देणारे कोण? असा सवाल त्याने केला.
तर झाले असे की, सध्या फोन लावल्यानंतर अमिताभ यांच्या आवाजातील ऑडिओ क्लिप ऐकू येते. ज्यात ते कोरोनाबद्दलचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो, हे सांगतात. पण त्यांचा हा सल्ला या जवानाला अजिबात रुचला नाही. त्यामुळे संतापून या जवानाने थेट कस्टमर केअरला फोन केला. त्याच्या संभाषणाची आॅडिओ क्लिप आता सोशल मीडियावर वायरल होत आहे.
सीआरपीएफ जवान असल्याचा दावा करणारी ही व्यक्ती म्हणते, ‘ दिवसभरात जेव्हा केव्हा मी फोन करतो तेव्हा अमिताभ बच्चन हात धुण्याबाबत सांगत असतात. मी त्यामुळे त्रस्त झालो आहे. मला अमिताभ यांचा आवाज अजिबात ऐकायचा नाही. मला सल्ला देणारे ते कोण? जी व्यक्ती स्वत: कोरोना पॉझिटिव्ह होती, त्या व्यक्तीचा सल्ला मी का मानू? अमिताभ यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह होते, त्यामुळे मला सल्ला देण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. मी त्यांचा आवाज ऐकून वैतागलो आहे. मी हायकमांडपर्यंत ही गोष्ट नेऊ इच्छितो. तुम्ही हा प्रकार बंद केला पाहिजे. आम्ही त्यांचे म्हणणे का ऐकायचे?’ जवानाची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल होत आहे.
अन्य युजर्सनीही व्यक्त केला संतापया जवानाप्रमाणे अन्य अनेक युजर्सही अमिताभ यांचा ‘कोरोना’ कॉलर ट्यून ऐकून त्रासले आहेत.अन्य यूजर्सनीही या कॉलर ट्यूनबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘अमिताभ यांचा आवाज आणि मार्गदर्शक सूचना ऐकून मला खूप राग येतो. एकतर हा मेसेज खूपच मोठा आहे. दुसरे म्हणजे ज्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाला होता, त्यांना आम्हाला समजावण्याचा हक्क नाही, असे अरूणा नामक एका युजरने म्हटले आहे.तुम्हाला ठाऊक आहेच की, अमिताभ स्वत: शिवाय त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या व नात आराध्या हे सगळे कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. अमिताभ यांनी 11 जुलैला ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. तूर्तास अमिताभ बच्चन एकदम ठणठणीत असून केबीसीच्या शूटींगमध्ये बिझी आहेत.
KBC 12 : 'मनुस्मृती'वरील प्रश्नावरून वाद; विवेक अग्निहोत्री म्हणाले, कम्युनिस्टांनी हायजॅक केलाय शो
VIDEO : डेंटिस्टला दात दाखवत होती महिला, अचानक वाजली अशी रिंगटोन की बिग बी हसून हसून झाले बेजार...