Join us

​‘अंगूरी भाभी’ शिल्पा शिंदेची बॉलिवूड एन्ट्री! पाहा, हॉट आयटम साँग!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2017 10:27 AM

टेलिव्हिजनवरील लोकप्रीय भाभी म्हणजे अंगूरी भाभी. अर्थात पूर्वाश्रमीची. आता आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला कळले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते शिल्पा शिंदेबद्दल. टेलिव्हिजनची जुनी अंगुरी भाभी बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.

टेलिव्हिजनवरील लोकप्रीय भाभी म्हणजे अंगूरी भाभी. अर्थात पूर्वाश्रमीची. आता आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला कळले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते शिल्पा शिंदेबद्दल. टेलिव्हिजनची जुनी अंगुरी भाभी बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटातील एका आयटम साँगवर जोरदार डान्स करून तिने शिल्पाचे करिअर संपले असे म्हणणाºयांची  तोंडं  बंद केली आहेत. शिल्पाचे हे आयटम साँग आज रिलीज झाले. यात गाण्यात शिल्पाचा हॉट अंदाज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘मारो लाईन’ असे या गाण्याचे बोल आहेत. जलित पंडितने कम्पोज केलेले हे गाणे नेहा कक्कड आणि ऐश्वर्य निगम यांनी गायले आहे. या गाण्यात शिल्पा शिंदेसोबत ऋषी कपूर आणि वीर दास हे दोघेही थिरकताना दिसताहेत.  याआधी ‘पटेल की पंजाबी शादी’चे ‘पंजाबी-गुजराती सगाई साँग’ रिलीज झाले आहे. शिल्पाचे हे गाणे तुम्हाला कसे वाटले, हे आम्हाला सांगायला विसरू नका. कमेंटबॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतून शिल्पा शिंदे घराघरात पोहोचली होती. यातील तिने साकारलेले ‘अंगुरीभाभी’चे पात्र तुफान लोकप्रीय झाले होते. पण निर्मात्यांसोबत झालेल्या वादानंतर शिल्पाने या मालिकेला रामराम ठोकला आणि सगळ्यांनाच धक्का बसला होता. यानंतर शिल्पाचा या मालिकेच्या निर्मात्यांसोबतचा वाद चांगलाच रंगला होता. या वादादरम्यान शिल्पा करिअर संपले, असे अनेकांनी म्हटले होते. पण शिल्पाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत, सगळ्यांना धक्का दिला. ALSO READ : शिल्पा शिंदेचा आरोप, संजय कोहलीने केली सेक्सची डिमांड; तर संजयच्या पत्नीने केला शिल्पावर पलटवार ‘पटेल की पंजाबी शादी’ सिनेमाची कथा ही एका पंजाबी व गुजराती कुटुंबाची कथा आहे. ऋषी कपूरशिवाय परेश रावल यात मुख्य भूमिकेत आहे.