अनिल थडानी यांनी 2003 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रवीना टंडनला प्रपोज केले होते. लक्ष्मीपूजनानंतर अनिल यांनी रवीनाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर 2004 मध्ये दोघांनी लग्न केले.
इंडस्ट्रीत आल्यानंतर रवीनाचे अक्षय कुमारसोबत अफेअर होते. दोघेही नात्यात होते, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर रवीनाने छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले. हाच तो काळ होता जेव्हा तिने अभिनयासोबतच चित्रपट निर्मितीतही हात आजमावायला सुरुवात केली. दरम्यान अनिल थडानी आणि रविनाची भेट व्हॅलेंटाइन डे पार्टीत झाली होती.
अनिल थडानी हे चित्रपट दिग्दर्शक कुंदन थडानी यांचा मुलगा आहे. अनिल हे मोशन पिक्चर वितरण कंपनी एए फिल्म्सचा संचालक आहेत. या कंपनीने फुक्रे, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, वेलकम 2 कराची, फिरंगी आणि 2.0 यासह अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांचे वितरण केले आहे.
अनिल थडानी यांचं पहिले लग्न नताशा सिप्पीसोबत झाले होते, जी चित्रपट निर्माता रोम्यू एन सिप्पी यांची मुलगी आहे. रोम्यू सिप्पी चुपके चुपके, आनंद आणि सत्ता पर सत्ता सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातात.
रिपोर्टनुसार चित्रपटांमध्ये काम करताना अनिल यांची रवीना टंडनशी भेट झाली. दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. त्यादरम्यान अनिल यांनी नताशाला घटस्फोट दिला. अनिल आणि रवीना यांच्यातील जवळीक वाढत गेली. दोघेही जवळपास सहा महिने एकमेकांना डेट करत होते.रविनाच्या वाढदिवशी अनिल यांनी तिला लग्नाची मागणी घातली. त्याकाळी रविनाचा लग्नसोहळा मोठ्या थाटात झाला होता. या लग्नात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती. यानंतर त्यांनी 22 फेब्रुवारी 2004 रोजी उदयपूरमध्ये शाही पद्धतीने लग्न केले.