झक्कास अभिनेता अनिल कपूर (Anil kapoor) बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याच्यावर वाढत्या वयाचा काहीही परिणाम होत नाही. साठीतही त्याच्यात यंगस्टर्सप्रमाणे एनर्जी आहे. अनिल कपूर आज आपला 65वा वाढदिवस (Anil Kapoor Birthday) साजरा करतो आहे, मात्र यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. अनिल कपूरने ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. हार्डवर्क आणि जबरदस्त अदाकारीच्या जोरावर त्याने बी-टाउनमध्ये स्वत:चे एक वेगळेच स्थान निर्माण केले. मात्र त्याचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता.
अनिल कपूर आपल्या कुटुंबासोबत मुंबईत जुहू येथील बंगल्यात राहतो. पण, तुम्हाला माहित आहे का की, अनिल कपूर व्यतिरिक्त दुबई, कॅलिफोर्निया आणि लंडनमध्येही फ्लॅट आहे. मात्र एक काळ असाही होता, जेव्हा त्याला परिवारासोबत एका छोट्याशा गॅरेजमध्ये राहावे लागत होते. होय, जेव्हा अनिल कपूरचे वडील सुरेंद्र कपूर परिवाराला घेवून मुंबईत आले होते, तेव्हा ते त्यांच्या परिवारासमवेत गॅरेजमध्ये राहत होते. आपल्या ४० वर्षांच्या करिअरमध्ये अनिल कपूरने शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. ‘तेजाब, मिस्टर इंडिया, विरासत, पुकार, ईश्वर, स्लमडॉग मिलिनेयरसारख्या सुपरहिट चित्रपटांचा त्यामध्ये समावेश आहे. मात्र हे वैभव मिळविण्यासाठी त्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागले.
अनिल कपूरचे आयुष्य सुरुवातीपासून सुखासमाधानाचे आणि चैनीचे होते असे नाही. जेव्हा अनिल कपूरचे वडील परिवाराला घेऊन मुंबईत आले होते, तेव्हा त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती. अशात त्यांनी परिवारासमवेत गॅरेजमध्ये निवारा शोधला. बरेच दिवस त्यांना गॅरेजमध्ये काढावे लागले. होय, अनिल कपूरचे वडील परिवारासमवेत एकेकाळी शो मॅन राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहत होते. अतिशय कष्ट करून त्यांनी पुढे यश मिळविले.
काही दिवस गॅरेजमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्यांनी एका सर्वसामान्यांच्या वसाहतीत एक खोली भाड्याने घेतली. पुढे सुरेंद्र कपूर यांनी आपल्या परिवाराला चांगले जीवन देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सुरेंद्र कपूर दिग्दर्शक होते. पुढे त्यांनी मुलगा अनिललाही इंडस्ट्रीत आणले. अनिलने मुख्य अभिनेता म्हणून १९८० मध्ये एका तेलगू चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून बघितले नाही. अनिलच्या यशस्वीतेने त्याच्या परिवारालाही सावरले.