Join us

अनिल कपूर वयाचे बंधन तोडणारा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2016 5:22 PM

anil kapoor birthday special ; प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुरेंद्र कपूर यांचा मुलगा असलेला अनिल तीन भावांत मधला आहे. अनिलचा मोठा भाऊ बोनी चित्रपट निर्माता असून लहान भाऊ त्याच्याप्रमाणेच अभिनेता आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच अनिल कपूर याने मॉडेल सुनीता सोबत लग्न केले

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा डायलॉग ‘झक्कास’ आजही लोकांच्या तोंडी आहे. त्याला बॉलिवूडचा झक्कास स्टार म्हणूनही ओळखले जाते. अनिल कपूरला बॉलिवूडमध्ये काम करताना तब्बल ३२ वर्षे होत आहेत. या लांबलचक करिअरमध्ये त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्यांत अनिल कपूरचा उल्लेख केला जातो. त्याचा समावेश अशा अभिनेत्यांत केला जातोय ज्याने वयाला मागे सोडून चित्रपटाच्या दुनियेत आपल्या अभिनयाचा जलवा कायम राखला आहे. आज अनिल कपूरचा वाढदिवस. त्याला अनेक शुभेच्छा!उमेश मेहरा यांच्या ‘हमारे तुम्हारे’(१९७९) या चित्रपटातून सहायक अभिनेता म्हणून अनिल कपूर याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून मागील चार दशक अनिल कपूर आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करीत आहे. २४ डिसेंबर १९५९ साली मुंबईत जन्मलेल्या अनिल कपूर यांनी बॉलिवूडच्या विकासाचा प्रवास जवळून पाहिला आहे.प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुरेंद्र कपूर यांचा मुलगा असलेला अनिल तीन भावांत मधला आहे. अनिलचा मोठा भाऊ बोनी चित्रपट निर्माता असून, लहान भाऊ त्याच्याप्रमाणेच अभिनेता आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच अनिल कपूर याने मॉडेल सुनिता सोबत लग्न केले. अनिलला सोनम, हर्षवर्धन व रिया अशी तीन अपत्ये आहेत. बॉलिवूडमध्ये १०० हून अधिक चित्रपट करणाºया अनिल कपूरला बॉलिवूडमध्ये करिअर करताना चांगलाच संघर्ष करावा लागला. १९८० साली हम पाच व १९८२ साली शक्ती या चित्रपटात अनिल कपूर याला लहान भूमिकांतच समाधान मानावे लागले. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या वो सात दिन या चित्रपटाने अनिल कपूरला खरी ओळख मिळवून दिली. यात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. अनिल कपूरने बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटातही भूमिका साकारल्या आहे. तेलगू चित्रपट ‘वम्सावृक्ष’ आणि कन्नड चित्रपट ‘पल्लवी अनुपल्लवी’ या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. पल्लवी अनुपल्लवी हा मनिरत्मचा पहिला चित्रपट असून या चित्रपटाने देशभरात चांगलीच प्रशंसा मिळविली होती. अनिल कपूरच्या २००१ साली आलेल्या पुकार या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९८४ साली प्रदर्शित झालेला यश चोपडा यांच्या ‘मशाल’ या चित्रपटात दिलीप कुमार, वहिदा रहेमान, रती अग्नीहोत्री यांच्या तोडीचा अभिनय सादर के ला. १९८५ साली आलेल्या ‘मेरी जंग’मधून न्यायासाठी लढणारा तरूण त्याने तेवढ्याच ताकदीने साकारला. अनिल कपूर याने बॉलिवूड चित्रपटांसह हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. हॉलिवूड चित्रपट ‘स्लमडॉग मिलीनिअर’ या चित्रपटाने त्याला आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटाला आॅस्कर पुरस्कार मिळाला होता. अनिल कपूर याने हॉलिवूड टीव्ही सिरीज २४ याचे भारतीय रूपांतरण सादर केले असून, यात तो मुख्य भूमिकेत दिसतो. लवकरच अनिल कपूरचा ‘मुबारकां’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनिल कपूर  नाव : अनिल सुुरिंदर कपूर जन्म: 24 डिसेंबर 1959 (मुंबई. महाराष्ट्र)पत्नी: सुनीता कपूरमुले: सोनम कपूर, रिहा कपूर, हर्षवर्धन कपूर गाजलेले चित्रपट: वो सात दिन (1983), मशाल (1984), मेरी जंग (1985), कर्मा (1986), चमेली की शादी (1986), मिस्टर इंडिया (1987), राम लखन (1989), तेजाब (1988), लम्हे (1991), बेटा (1992), विरासत (1997), ताल (1999), पुकार (2000), नायक (2001)टीव्ही कार्यक्रम: - मिळालेले पुरस्कार : राष्ट्रीय पुरस्कार : सर्वश्रेष्ठ अभिनेता (पुकार), स्पेशल ज्यूरी अवार्ड (गांधी माय फादर), फिल्मफेअर पुरस्कार : सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता - मशाल, ताल,  फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार - तेजाब, बेटा, फिल्मफेयर क्रिटिक्स सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार - विरासत