Join us

अनिल कपूर यांनी हे गाणे रिलीज करून मोहम्मद रफींना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 15:26 IST

अनिल कपूर यांनी 'बदन पे सितारे...' गाण्याचे रिमेक प्रदर्शित करुन मोहम्मद रफी साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ठळक मुद्दे‘बदन पे सितारे…’ या गाण्याला सोनू निगमने दिला स्वरसाज

प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिनेता अनिल कपूर यांनी त्याचा आगामी चित्रपट ‘फन्ने खान’च्या एका गाण्यामार्फत रफी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हे गाणे दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नसून मोदम्मद रफी यांनीच गायलेले लोकप्रिय गाणे  ‘बदन पे सितारे..’ हे गाणे आहे.

काही दिवसांपूर्वी अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आपण लवकरच मोहम्मद रफी यांचे सुपरहिट ‘बदन पे सितारे…’ या गाण्याचा रिमेक प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले होते. हे गाणे ‘फन्ने खान’ चित्रपटाचा भाग असल्याचेही त्याने सांगितले होते. हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. रफी साहेबांच्या या एव्हरग्रीन गाण्याला सोनू निगमने आवाज दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपट निर्मात्यांनी या गाण्याशी कुठल्याही प्रकारे छेडछाड केलेली नाही. या गाण्यामध्ये मध्यंतरी ‘फन्ने’ असे नाव घेण्यात आले आहे. पण तरीही रफी साहेबांच्या गाण्यातला जिवंतपणा या गाण्यात अनुभवायला मिळतो.

 

अनिल कपूर यांनी आपल्या चाहत्यांना हे गाणे प्रदर्शित झाल्याची बातमी ट्विटवरुन दिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘आम्ही मोहम्मद रफी साहेबांइतके छान गाणे बनवू शकत नाही, तरीही हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे’. त्याचबरोबर मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याकडून ही छोटीशी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या गाण्यामध्ये अनिल कपूर मंचावर सोनेरी रंगाचे कोट घालून गाणे गाताना दिसत आहेत. 

टॅग्स :अनिल कपूर