Join us

हृतिकने स्तुती केल्यानंतर अनिल कपूरच्या डोळ्यात पाणी, 'फायटर' च्या इव्हेंटमधला Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 18:15 IST

अनिल कपूरच्या डोळ्यात पाणी आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हृतिक रोशनचा (Hrithik Roshan)  आगामी 'फायटर' (Fighter) सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दीपिका पदुकोण आणि अनिल कपूरही सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सध्या तिघेही सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतंच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये हृतिकने अनिल कपूरची (Anil Kapoor) खूप स्तुती केली. हे ऐकून अनिल कपूरच्या डोळ्यात पाणी आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

माध्यमांशी बोलताना हृतिक म्हणाला, "मी फिल्मच्या सेटवर अनिल कपूरला बघूनच मोठा झालो आहे. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे.फायटरमध्ये अनिल सरांचा एक सीन होता. तो त्यांनी असा काही दमदार पद्धतीने परफॉर्म केला जे पाहून मी दंग झालो. मी नंतर त्यांना जाऊन सांगितलंही की तुम्ही खूप छान सीन दिलात. हे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आजही ते प्रत्येक सीनमध्ये जीव ओततात. यांचा अभिनय पाहून हेच वाटतं की एकदा यांचा असिस्टंट बनतो."

हृतिक हे सांगत असताना बाजूला बसलेल्या अनिल कपूरच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. अनिल कपूर भावूक होतो. त्याला अशा प्रकारे पहिल्यांदाच भावूक झालेलं कोणी पाहिलं असेल. अनिल कपूर सर्वात चिरतरुण दिसणारा अभिनेता आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्याचा फिटनेस वाखणण्याजोगा आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या Animal सिनेमात त्याने रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली. तर आता फायटरमध्ये तो हवाई दल अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. दोन्ही भूमिका अत्यंत वेगळ्या आहेत मात्र त्या त्याने उत्तम निभावल्या आहेत. 

25 जानेवारी रोजी 'फायटर' चित्रपटगृहात रिलीज होत आहे. हृतिक, अनिल आणि दीपिका यांच्यासोबतच सिनेमात करण सिंह ग्रोवर, संजीदा शेख आणि अक्षय ओबेरॉय यांचीही भूमिका आहे. यामधून पहिल्यांदाच हृतिक आणि दीपिकाची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 

टॅग्स :हृतिक रोशनअनिल कपूरसोशल मीडियादीपिका पादुकोण