Join us

अनिल कपूरने केली करिना कपूरची पोलखोल, वीरे दे वेडिंगच्यावेळेसचा सांगितला किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 14:34 IST

करिना कपूरच्या व्हॉट वुमन वॉन्ट्स मध्ये अनिलने त्याच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. त्याचसोबत त्याने करिनाविषयी देखील एक सिक्रेट सांगितले.

ठळक मुद्देवीर दे वेडिंग या चित्रपटासाठी करिनाने जास्त मानधन मागितले होते. नायकापेक्षादेखील नायिका अधिक मानधन मागत असल्याचे इतर निर्मात्यांनी मला सांगितले होते.

करिना कपूर गरोदर असून लवकरच तिच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार आहे. करिना गरोदर असताना देखील काम करताना दिसत आहे. व्हॉट वुमन वॉन्ट्स याच तिच्या चॅट शोची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चॅट शोचे सध्या ती चित्रीकरण करत असून या शोमध्ये नुकतीच अनिल कपूरने उपस्थिती लावली. या कार्यक्रमात त्याने करिनासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. तसेच अनेकांची गुपितंदेखील सांगितली. 

करिना कपूरच्या व्हॉट वुमन वॉन्ट्स मध्ये अनिलने त्याच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. त्याचसोबत त्याने करिनाविषयी देखील एक सिक्रेट सांगितले. या कार्यक्रमात करिनाने अनिलला विचारले की, हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये पुरुष कलाकारांइतकेच स्त्री कलाकाराला मानधन मिळत असेल तरच पुरुष कलाकार चित्रपटात काम करायला तयार होतात. बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील असेच केले पाहिजे असे तुम्हाला वाटते का यावर अनिलने उत्तर दिले की, तू तर माझ्याकडून खूप सारे मानधन घेतले आहेस... यावर करिना लगेचच म्हणाली, आम्ही हीच गोष्ट बदलण्याचा प्रयत्न करतोय ना...

यापुढे अनिल यांनी सांगितले, वीरे दे वेडिंग या चित्रपटासाठी करिनाने जास्त मानधन मागितले होते. नायकापेक्षादेखील नायिका अधिक मानधन मागत असल्याचे इतर निर्मात्यांनीच मला सांगितले होते. मी देखील या चित्रपटाचा एक निर्माता होता. त्यामुळे बेबो जी रक्कम मागते ती तिला देऊन टाका... असे मी सांगितले होते. वीर दे वेडिंगची निर्मिती अनिल कपूर, त्याची मुलगी रिया कपूर, शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी मिळून केली होती.

अनिल कपूर आणि करिना कपूर यांनी टशन, वेबफा यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ते लवकरच करण जोहरच्या तख्त या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.

टॅग्स :करिना कपूरअनिल कपूर