बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता म्हणून कायमच अनिल कपूरकडे पाहिलं जातं. 1979 मध्ये हमारे तुम्हारे या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अनिलने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला आहे. त्यामुळेच आज तो लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अग्रस्थानावर आहे. उत्तम अभिनय आणि फिटनेसच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या अनिल कपूरने एकेकाळी न्यूड सीन शूट केला होता.
२० वर्षांपूर्वी अनिलचा 'नायक: द रियल हिरो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील अनिलचा अभिनय तुफान गाजला होता. विशेष म्हणजे याच चित्रपटासाठी अनिलने ३६ कॅमेरांसमोर न्यूड सीन दिला होता. अलिकडेच या चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने अनिलने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटातील काही अनुभव शेअर केले आहेत.
"यशाचं शिखर गाठणाऱ्या चित्रपटांपैकी नायक एक आहे. अभिनेता म्हणून मला माझ्यातील अॅक्शन हिरोची भेट घडवून देण्यासाठी आणि माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी शंकर यांचे मनापासून आभार. या चित्रपटात बसच्या टपावर चढून स्वत:ला बॅलन्स करणं हा सीन माझ्यासाठी फारच कठीण होता.हा चित्रपट कायमच माझ्या जवळचा असून लवकरच तो यापुढची २० वर्षही गाठेल", असं अनिल म्हणाला.
नायकसाठी अनिलने पहिल्यांदाच न्यूड बॉडी शूट केलं होतं. कम्प्युटराइज माध्यमाचा वापर करुन चित्रपटातील अॅक्शन सीनचा सिक्वेस तयार करण्याची ही पहिलीच वेळ होती. यात एकाच वेळी एका फ्रेममध्ये जवळपास ३६ कॅमेराचा वापर करण्यात आला होता.
Hyderabad rape case: अक्षय कुमार, सलमानसह 38 सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल
दरम्यान, एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल आणि जॉनी लिवर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात अनिलने शिवाजीराव ही भूमिका साकारली होती. सध्या अनिल जुग जुग जियो या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये बिझी आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वरुण धवन, नीतू कपूर आणि कियारा आडवाणी स्क्रीन शेअर करणार आहे.