Join us  

Anil Kapoor : उणे ११०° तापमानात ६६ वर्षांच्या अनिल कपूर यांचं शर्टलेस वर्कआऊट, VIDEO पाहून सगळेच थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 12:32 PM

Anil Kapoor Shirtless Workout Video: होय, ६६ वर्षांच्या अनिल कपूर यांचं वर्कआऊट पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. स्वत: अनिल कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Anil Kapoor Shirtless Workout Video: एकीकडे ८७ वर्षांच्या धर्मेन्द्र यांचं वर्कआऊट पाहून सर्वजण थक्क होतात, दुसरीकडे अनिल कपूर यांच्या वर्कआऊटनं सर्वांना हैराण केलं आहे. होय, ६६ वर्षांच्या अनिल कपूर यांचं वर्कआऊट पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. स्वत: अनिल कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

काल त्यांनी मास्क लावून ट्रेडमिलवर धावतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं होतं. आता त्यांनी उणे ११० डिग्री तापमानात वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. शर्टलेस होऊन मायनस ११० डिग्रीमधलं त्यांचं हे वर्कआऊट पाहून प्रत्येक जण अवाक् झाला आहे.

“४० मध्ये खोडकर होण्याची वेळ गेली आहे. आता ६० मध्ये सेक्सी होण्याची वेळ आली आहे,” असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनिल कपूर यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेतच, पण अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. जॅकी श्रॉफ, कार्तिक आर्यन, नीतू कपूर, शिल्पा शेट्टी, भूमी पेडणेकर अशा सगळ्यांनी या वयातील अनिल कपूर यांचा जोश पाहून त्यांचं कौतुक केलं आहे.

अनिल कपूर यांच्या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. तुमच्या जिद्द आणि चिकाटीला सलाम, असं एका युजरने लिहिलं आहे. यू आर ग्रेट एके, असं एकाने लिहिलं आहे. तर हे आहे तुमच्या तरणपणाचं रहस्य, अशी कमेंट एका युजरने केली आहे. काहींनी काळजीही व्यक्त केली आहे. सर, फिटनेस जपा, पण अतिरेक होऊ देऊ नका, अशा आशयाच्या कमेंट्स काही युजर्सनी केल्या आहेत.

कसली आहे तयारी...?अनिल कपूर लवकरच फायटर या सिनेमात झळकणार आहे. याच सिनेमासाठी ते घाम गाळत आहेत. फॅट कमी करण्यासाठी आणि फिटनेससाठी अनिल कपूर कायरोथेरपी घेत आहेत. याला कोल्ड थेरपी असंही म्हणतात. एक्स्पर्टच्या मार्गदर्शनाखालीच ही थेरपी केली जाते.फायटर या सिनेमात दीपिका पादुकोण, हृतिक रोशन, करणसिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत. अनिल कपूर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होतोय.  

टॅग्स :अनिल कपूरबॉलिवूड