नेहमी बिंधास्त मूड मध्ये असणारा अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) जेव्हा चिडतो तेव्हा काय होतं याचा प्रत्यय नुकताच त्याच्या निकटवर्तीयांना आला. ६० व्या वर्षी सुद्धा आपल्या फिटनेसमुळे अनिल कपूर चर्चेत असतो. त्याच्याकडून सध्याचे तरुण कलाकारही प्रेरणा घेतात. अनिल कपूरला नेहमीच हँसी मजाकच्या मूडमध्ये पाहिलं गेलंय. पण काल एका कार्यक्रमात अनिल चांगलाच भडकलेला दिसला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अनिल कपूरच्या 'नाईट मॅनेजर' वेबसिरीजचा दुसरा सिझन नुकताच प्रदर्शित झाला. यावेळी अनेक कलाकारांनी स्क्रीनिंगला हजेरी लावली. शोची पूर्ण स्टारकास्ट यावेळी उपस्थित होती. यावेळी फोटो आणि व्हिडिओसाठी पापाराझींची गर्दी जमली होती. दरम्यान गर्दीत अभिनेत्री शोभिता धुलीपाला मागे उभी होती. तिला गर्दीतून पुढे जायचं होतं. हे अनिल कपूरच्या लक्षात येताच त्याने तिला हात देत वाट मोकळी करुन दिली. यानंतर अनिल कपूर चांगलाच भडकला. त्याच्या निकटर्तीयांकडे बघत रागातच म्हणाला, 'माझी मदत करा यार.' अनिल कपूरला चिडलेलं पाहताच त्याचे साथी 'सॉरी सॉरी' म्हणत पुढे येतात आणि त्याला गर्दीतून बाजूला घेऊन जातात.
अनिल कपूरचा असा अवतार लोकांनी पहिल्यांदाच पाहिला असेल. पण या व्हिडिओवर अनिलला चांगलंच ट्रोल करण्यात आलंय. अनिलचं आता म्हातारपण आलंय म्हणूनच तो चिडला अशी कमेंट एकाने केली आहे. सध्या अनिल ओटीटीवर चांगलाच लोकप्रिय होतोय. कोणतीही भूमिका असो अनिल कपूर नेहमीच वरचढ ठरतो.