बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अनिल कपूर आपल्या फिटनेसने वाढत्या वयाला मात देत आहेत. अनिल कपूर यांच्यासाठी वय केवळ एक संख्या बनून राहिली आहे. अनिल कपूर हे नेहमीच त्यांच्या वर्कआउटचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनिल कपूर कितीही फिट दिसत असले तरी गेल्या १० वर्षांपासून ते पायाशी संबंधित अकिलिस टेंडन नावाच्या समस्येसोबत लढत होते. आता त्यांनी विना सर्जरी ही समस्या दूर केली आहे.
अनिल कपूर यांनी शुक्रवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत. यासोबतच्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या अनुभवाबाबत सांगितले. तसेच त्या डॉक्टरांचाही उल्लेख केला ज्यांच्या मदतीने ते विना सर्जरी करताच ठिक झाले. (महेश बाबूच्या सिनेमात झाली 'झक्कास' बॉलिवूड स्टारची एन्ट्री?, सिनेमा ब्लॉकबस्टर होण्याची चर्चा जोरात)
अनिल कपूर यांनी लिहिले की, 'मी गेल्या १० वर्षांपासून अकिलिस टेंडन या समस्येचा शिकार झालो होतो. जगभरातील डॉक्टरांनी मला सांगितले होते की, ही समस्या दूर केली जाऊ शकत नाही आणि मला सर्जरी करावी लागेल. पण डॉक्टर मुलर यांनी माझ्यावर चांगले उपचार केला आणि मला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मदतीने सर्जरी न करता मी ठीक झालो. मला आता व्यवस्थित चालता येतं. मी पुन्हा धावू लागलो आहे आणि आता स्किपिंगही आरामात करू शकतो'. (कोरोना विरुध्द लढ्यात अभिनेता अनिल कपूर मैदानात)
वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर अनिक कपूर लवकरच अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत दिसणार आहे. त्यासोबतच ते करण जोहरच्या आगामी 'तख्त' सिनेमातही काम करताना दिसणार आहेत. ते शेवटचे 'मलंग' सिनेमात दिसले होते.