Join us

Anil Kapoor : 'गरजच काय?' ऑक्सिजन मास्क लावून ट्रेडमिलवर पळतोय अनिल कपूर, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 12:31 IST

अनिल कपूर यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) वयाच्या 66 व्या वर्षी सुद्धा अतिशय फिट आहेत. त्यांना एव्हरग्रीन अभिनेता म्हणूनच ओळखलं जातं. त्यांच्याकडे बघून वयाचा अंदाजही लागणार नाही. तरुणांनाही लाजवेल अशी त्यांची फिटनेस आणि एकंदरतीच व्यक्तिमत्व आहे. कलाकारांना फिट राहण्यासाठी सतत मेहनत करावीच लागते. मात्र सध्या अनिल कपूरचा असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो चक्क तोंडाला ऑक्सिजन लावून ट्रेडमिलवर पळतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आता अनिल कपूरला ट्रोल करत आहेत.

अभिनेते अनिल कपूर यांनी स्वत:च त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते ट्रेडमिलवर पळत आहेत. मात्र त्यांनी तोंडाला ऑक्सिजन मास्क लावला आहे. त्यांने काळा टीशर्ट घातला असून ऑक्सिजन मास्कची बॅग लावलेलीही दिसत आहे. 'फायटर मोड ऑन!' असं कॅप्शनही त्याने दिलं आहे.

अनिल कपूरचा हा व्हिडिओ बघून नेटकरी मात्र संतापले आहेत.'जर ऑक्सिजनची गरज पडत आहे तर पळतो कशाला' असा सवाल एका नेटकऱ्याने विचारलाय. 'कोणी सांगेल का मास्क लावून का पळतोय? असाच प्रश्न दुसऱ्याने विचारलाय. अनिल कपूरची नुकतीच 'नाईट मॅनेजर' ही सिरीज प्रदर्शित झाली. यामध्ये आदित्य रॉय कपूरचीही मुख्य भूमिका होती. 

टॅग्स :अनिल कपूरबॉलिवूडव्यायामफिटनेस टिप्ससोशल मीडियाट्रोल