Join us

मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीसाठी अनिल कपूर यांची स्पेशल पोस्ट, ट्विटमध्ये म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 12:26 IST

अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी जितेंद्र जोशी(Jitendra Joshi)साठी ट्विटरवर स्पेशल पोस्ट लिहिली आहे. अनिल कपूर यांच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.  मे २०२२ मध्ये त्यांचा ‘थार’ (Thar Movie) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटात त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. याच चित्रपटात मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी(Jitendra Joshi)देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. दरम्यान आता अनिल कपूर यांनी जितेंद्र जोशीसाठी ट्विटरवर स्पेशल पोस्ट लिहिली आहे. अनिल कपूर यांच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

थारला फिल्मफेअर ओटीटी अवॉर्डमध्ये नामांकन मिळाले आहे. जितेंद्र जोशीने या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका निभावली होती. या चित्रपटात जितेंद्रने साकारलेल्या पन्ना या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे नामांकन मिळाले आहे. अनिल कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर जितेंद्र जोशीचा फोटो पोस्ट करत ट्वीट केले आहे. ट्विटमध्ये लिहिले की,  वोट करा.  त्यांनी जितेंद्रला अवॉर्डसाठी मतदान करण्याची मागणी चाहत्यांना केली आहे. अनिल कपूर यांनी केलेले हे ट्वीट चर्चेत आले आहे. 

अनिल कपूर यांनाही या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नॉमिनेशन मिळाले आहे. त्यांनी जितेंद्र जोशीबरोबरच चित्रपटातील नामांकन मिळालेल्या इतर कलाकारांचे फोटोही ट्वीट करत मत देण्याची विनंती चाहत्यांना केलीय.

टॅग्स :अनिल कपूरजितेंद्र जोशी