Join us

विवाहित असूनही रवीना टंडनच्या प्रेमात पडले, अभिनेत्रीबरोबर लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 2:58 PM

अनिल थडानी यांचं पहिले लग्न नताशा सिप्पीसोबत झालं होते.

बॉलिवूड सेलिब्रिटी कायमच त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतात. यात बऱ्याचदा सेलिब्रिटींच्या रिलेशनशीप, ब्रेकअप किंवा पॅचअप याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आम्ही तुम्हाला आज रविना टंडन आणि  पती अनिल थडानी यांची लव्हस्टोरी सांगणार आहोत. 

अनिल थडानी हे चित्रपट दिग्दर्शक कुंदन थडानी यांचा मुलगा आहे. अनिल आज वाढदिवस सेलिब्रेट करतायेत. अनिल हे मोशन पिक्चर वितरण कंपनी एए फिल्म्सचा संचालक आहेत. या कंपनीने फुक्रे, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, वेलकम 2 कराची, फिरंगी आणि 2.0 यासह अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांचे वितरण केले आहे.

अनिल थडानी यांचं पहिले लग्न नताशा सिप्पीसोबत झाले होते, जी चित्रपट निर्माता रोम्यू एन सिप्पी यांची मुलगी आहे. रोम्यू सिप्पी चुपके चुपके, आनंद आणि सत्ता पर सत्ता सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातात.

रिपोर्टनुसार चित्रपटांमध्ये काम करताना अनिल यांची रवीना टंडनशी भेट झाली. दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. त्यादरम्यान अनिल यांनी नताशाला घटस्फोट दिला. अनिल आणि रवीना यांच्यातील जवळीक वाढत गेली. दोघेही जवळपास सहा महिने एकमेकांना डेट करत होते.रविनाच्या वाढदिवशी अनिल यांनी तिला लग्नाची मागणी घातली. त्याकाळी रविनाचा लग्नसोहळा मोठ्या थाटात झाला होता. या लग्नात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती. यानंतर त्यांनी 22 फेब्रुवारी 2004 रोजी उदयपूरमध्ये शाही पद्धतीने लग्न केले. 

 

टॅग्स :रवीना टंडन