सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) याचा Animal हा सिनेमा चांगलाच गाजताना दिसतोय. अनिल कपूर (anil kapoor), बॉबी देओल (bobby deol) , रश्मिका मंदाना (rashmika Mandanna) , उपेंद्र लिमये (upendra limaye) अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात झळकली आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने जवळपास 338.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा लवकरच ४०० कोटींचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या सिनेमासाठी दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगा यांनी चक्क त्यांची वडिलोपार्जित जमीन विकून पैसे उभे केले होते. एका कार्यक्रमात त्यांनी याविषयी खुलासा केला.
'अर्जुन रेड्डी', 'कबीर सिंह' अशा सुपरहिट सिनेमांची निर्मिती करुन लोकप्रिय झालेल्या संदिप रेड्डी वांगा यांचा Animal हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. Animal हा सिनेमा बराच पैसा खर्च करुन तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सिनेमासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे संदिप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांना त्यांची वडिलोपार्जित जमीन विकली.
"ज्यावेळी हा सिनेमा करण्याचं मी ठरवलं त्यावेळी माझ्याकडे फारसे पैसे नव्हते. १.५ कोटी रुपये मी लोकांकडून उसनवारी घेतले. १ कोटी पब्लिसिटीच्या माध्यमातून उभे केले. पण, तरी पैसे कमी पडत होते. मी सिनेमाच्या शुटिंगसाठी ऑफिस उघडलं त्यावेळी मग अनेकांनी मला आर्थिक मदत केली. पण, तरी आवश्यक असलेली रक्कम उभी रहात नव्हती. मग मी शेवटी माझी वडिलोपार्जित जमीन ती विकली. जवळपास ३६ एकर जमीन होती जी मी विकली आणि त्यातून १.६ कोटी रुपये उभे केले. त्यानंतर कुठे सिनेमासाठीचं बजेट पूर्ण झालं", असं संदिप रेड्डी वांगा यांनी सांगितलं.
दरम्यान, संदिप रेड्डी वांगा यांचे आतापर्यंत अनेक सिनेमा सुपरहिट ठरले आहेत. केवळ सुपरहिटच नाही तर त्यांनी बॉक्सवर तुफान कमाईदेखील केली आहे. या सिनेमापूर्वी त्याचा 'कबीर सिंग' आणि 'अर्जुन रेड्डी' हा सिनेमाही सुपरहिट ठरला आहे.