Join us  

रणबीर कपूरच्या Animal मधील 'तो' deleted scene व्हायरल, नेटकरी म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 11:56 AM

सेन्सॉर बोर्डाने Animal मधील अनेक सीन्सला कात्री लावली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) Animal सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. तीनच दिवसात सिनेमाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. Animal मध्ये खूपच हिंसा, रक्तपात दाखवण्यात आल्याने सिनेमाला A सर्टिफिकेट देण्यात आलंय. तसंच सेन्सॉर बोर्डाने अनेक सीन्सला कात्री लावली आहे. तरी सिनेमातील एक डिलीटेड सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कबीर सिंह फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा Animal चीच सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमातील 'अर्जन व्हॅली' हे गाणं तर ठिकठिकाणी वाजतंय. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने अनेक सीन्स, डायलॉग्सना कात्री लावली. मात्र तरी सिनेमातील एक सीन तुफान व्हायरल होतोय. हा विमानात शूट झालेला सीन आहे. यामध्ये रणबीर कपूर अतिशय जखमी अवस्थेत दिसत असून तो दारुचा ग्लास भरतो आणि पायलट सीटवर जाऊन बसतो. यानंतर त्याला धुम्रपान करतानाही दाखवण्यात आलंय. रणबीरचा हा अवतार विमानातील प्रवासी शॉक होऊन बघत असतात असा तो सीन आहे. 

हा सीन बघून नेटकऱ्यांनी मात्र यात डिलीट करण्यासारखं काय होतं असा प्रश्न विचारलाय. सध्या थिएटरमध्ये Animal ने धुमाकूळ घातला आहे. सिनेमाचं ओपनिंग कलेक्शनच 60 कोटींपेक्षा जास्त झालं आहे. तर तीन दिवसात सिनेमाने 200 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरसिनेमासोशल मीडिया