Join us

अबरारला मारल्यानंतर रणबीर आणि गँगने काय केलं? 'अ‍ॅनिमल'मधील Deleted सीन व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 16:36 IST

रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' मधील सिनेमात नसलेला एक सीन व्हायरल झालाय. यात अबरार म्हणजेच बॉबी देओलला मारल्यानंतर पुढे काय घडलं ते पाहायला मिळतंय (animal)

'अ‍ॅनिमल' सिनेमा २०२३ चा चांगलाच गाजला. १ डिसेंबर २०२३ ला रिलीज झालेल्या रणबीर कपूरच्या  'अ‍ॅनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कामगिरी केलीच शिवाय प्रेक्षकांचंही प्रेम मिळवलं.  'अ‍ॅनिमल' च्या कथानकावर बऱ्या वाईट प्रमाणात टीकाही झाली. तरीही  'अ‍ॅनिमल' सिनेमाने विरोध सहन करुनही बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. अशातच तब्बल ८ महिन्यांनी 'अ‍ॅनिमल'  सिनेमातील deleted सीन व्हायरल झालाय. यात अबरारला मारल्यानंतर रणबीर आणि त्याच्या गँगने काय केलं ते दिसतंय. 

अबरारला मारल्यानंतर रणबीरने काय केलं?

ज्यांनी 'अ‍ॅनिमल' पाहिलाय त्यांना माहितच असेल की, शेवटी रणबीर आणि अबरार (बॉबी देओल) एका प्रायव्हेट प्लॅनमधून एकमेकांच्या आमनेसामने येतात. दोघेही हाणामारी करतात. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवतात. शेवटी रणबीर गळा कापत बॉबी देओलला मारुन टाकतो. त्यानंतर काय घडलं ते या deleted सीनमध्ये बघायला मिळतं. रणबीर आणि त्याच्यासोबत असलेली सरदार गँग प्रायव्हेट प्लेनमधून उड्डाण घेते. रणबीरच्या हातात दारुचा ग्लास असतो. तो नशेच्या धुंदीत पायलटला बाजूला व्हायला सांगतो. विमानाचं सूत्रं स्वतःच्या हातात घेऊन रणबीर भरारी मारतो. हा deleted सीन सध्या चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय. 

'अ‍ॅनिमल' सिनेमाविषयी

१ डिसेंबरला 'अ‍ॅनिमल' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाची खूप चर्चा झाली. सिनेमाचं कथानक आणि त्यात दाखवलेली हिंसा अशा अनेक गोष्टींवर समीक्षकांनी बोट ठेवलं. सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, रश्मिका मंदाना, शक्ती कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेने साकारलेली फ्रेडीची भूमिकाही चांगलीच गाजली. 'अ‍ॅनिमल' सध्या नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहू शकता

टॅग्स :रणबीर कपूरबॉबी देओलबॉलिवूड