संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील काही सीन्स, डायलॉग आणि गाणीही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत. 'ॲनिमल'मधील काही सीन्समुळे या सिनेमाला ट्रोलही केलं गेलं. त्यातच बॉबी देओलने 'ॲनिमल'च्या क्लायमॅक्समध्ये माझा आणि रणवीरचा किसिंग सीन होता. पण, संदीप रेड्डींनी तो काढून टाकल्याचं विधान बॉबीने केलं होतं. आता यावर मौन सोडत संदीप रेड्डींनी भाष्य केलं आहे.
'ॲनिमल'मधील रणबीर-बॉबीच्या किसिंग सीनवर संदीप रेड्डींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. सिनेमातून रणबीर-बॉबीचा तो सीन काढून टाकण्यामागचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. ते म्हणाले, "बॉबीला रणबीरच्या गालावर किस करायचं होतं. भाई, मी माझ्या वडिलांबरोबर एकही दिवस घालवला नाही, असं बॉबी रणबीरला म्हणतो. त्यानंतर तो बाजूला जाऊन त्याची चैन उघडतो, असा सीन होता. तो सीन छान शूटही झाला होता. पण किसींग सीनमुळे चैन उघडल्याच्या सीनची मजा जाईल, असं मला वाटलं. बॉबीने हा सीन करताना कुत्सित हास्य चेहऱ्यावर आणले आणि डोळ्यातील अश्रू त्याच्या गालावर पडले. मला वाटतं किसिंग सीनपेक्षा हे जास्त सिनेमॅटिक आहे."
दरम्यान, 'ॲनिमल' सिनेमा प्रदर्शनानंतर २० दिवसांनीही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत जगभरात ८०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. रणबीर कपूरबरोबर या सिनेमात रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.