टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिला चर्चेत राहणं चांगलंच जमतं. या ना त्या कारणानं ती सतत चर्चेत असते. कधी ग्लॅमरस फोटो, कधी नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक व्हिडीओ ती शेअर करत असते. सध्या तिच्या अशाच एका रोमॅन्टिक व्हिडीओची चर्चा आहे. होय, अंकिताने बाथटबमध्ये नवऱ्यासोबत रोमॅन्टिक पोझ दिल्या. या रोमान्सचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे आणि मग काय? नेहमीप्रमाणे अंकिता ट्रोल झाली.
नुकताच अंकिताचा पती विकी जैनचा ( Vicky Jain) वाढदिवस झाला. दोघांनी दुबईत वाढदिवस साजरा केला. यावेळी रोमॅन्टिक फोटोशूट करण्याचा मोह दोघांनाही आवरला नाही. फोटोशूटसाठी दोघांनीही कोणतं ठिकाण निवडलं तर बाथरूममधील बाथटब. चक्क बाथरूमधील बाथटबमध्ये दोघं रोमान्स करताना दिसले. बाथटबमध्ये दोघांनीही खास फोटोशूट केलं.
अंकिताने हा व्हिडीओ शेअर केला आणि ट्रोलर्सने तिला फैलावर घेतलं. व्हिडीओ बघताच लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ‘मला तर आता हे दोघं सायको वाटायला लागले आहेत,’ असं एका युजरने लिहिलं. ‘हिचा शो ऑफ संपत नाहीये. नवीन नवीन श्रीमंत झालेली...’, अशा शब्दांत एका युजरने अंकिताला ट्रोल केलं. ‘बाथटबमध्ये इतके कपडे घालून कोण जातं? वॉशिंग मशीनमध्ये तरी जायचं,’अशी कमेंट एका युजरने केली. ‘तुला लाज वाटत नाही का? का दिखावा करतेस,’ अशा शब्दांत अनेकांनी अंकिताला सुनावलं.
अंकिता व विकी जैन यांनी गतवर्षी 14 डिसेंबरला लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं. विकी एका कोळसा व्यापा-याचा मुलगा आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यवसाय करतात. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे.