अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. तिच्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर गेलंत की तिचे चिक्कार व्हिडीओ, फोटो पाहायला मिळतील. पण सध्याचा व्हिडीओ जरा वेगळा आहे. होय, अंकिताच्या बहिणीने तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो क्षणात व्हायरल झाला. मग काय, नेहमीप्रमाणे या व्हिडीओवरून लोकांनी अंकिताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. यात अंकिता एका रेस्टॉरंटमध्ये बसली आहे. रेस्टॉरंटमध्ये इंग्रजी गाण्यावर बसल्या बसल्या ती डान्स करतेय. तिच्या डान्स मुव्ह्ज् फारच मजेशीर आहेत. अंकिताच्या शेजारी तिचा पती विकी जैन देखील बसला आहे आणि अंकिता अगदी बेधुंद नाचते आहे.
व्हिडीओ शूट करणाऱ्यालाही हसू आवरत नाही. ते पाहून अंकितालाही हसू लागते. अंकिताच्या बहिणीने हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात अंकिताला टॅग केलं आहे. ‘याला साजेसं कॅप्शन सूचत नाहीये,’असं कॅप्शन तिने याला दिलं आहे. यावर अंकिताने, आय हेट यू, अशी कमेंट केली आहे.
अंकिता झाली ट्रोलअंकिताचा हा व्हिडीओ काही चाहत्यांना आवडला आहे. पण काहींनी मात्र तो पाहून नाक मुरडलं आहे. अनेकांनी यानंतर अंकिताला ट्रोल केलं आहे.
‘अनेकदा अंकिता वेड्यासारखं वागते,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. असं वागणं तुला शोभत नाही, अशी कमेंट एकाने केली आहे. काय मूर्खपूणा आहे, असं लिहित एका युजरने आपला संताप व्यक्त केला आहे. काहींनी याला ओव्हर अॅक्टिंग, ओव्हर कॉन्फिडन्सचं नावं दिलं आहे. काहींना मात्र हा व्हिडीओ आवडला आहे. अनेकांनी स्मायली इमोजी आणि हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत.