Join us

डिसेंबरमध्ये अंकिता-सुशांत करणार होते लग्न; म्हणून अभिनेत्रीने केलं याच महिन्यात विकी जैनशी लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 3:00 PM

Ankita lokhande: अंकिता-विकीच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'पवित्र रिश्ता' (pavitra rishta) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande). नुकतीच अंकिताने प्रियकर विकी जैनसोबत (vicky jain) लग्नगाठ बांधली असून सोशल मीडियावर तिची चर्चा आहे. या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हे फोटो पाहिल्यावर अनेकांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आठवणींना उजाळा दिला आहे. इतकंच नाही तर सध्या सुशांतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुशांतने अंकितासोबत डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अंकिताने मुद्दाम याच महिन्यात विकी जैनशी लग्नगाठ बांधली का? असा प्रश्न नेटकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.

विकी जैनला डेट करण्यापूर्वी अंकिता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होती हे साऱ्यांनाच ठावूक आहे. पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर या दोघांचं सूत जुळलं. मात्र, काही कारणास्तव ते विभक्त झाले. परंतु,आजही या जोडीवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. त्यामुळेच सध्या अंकिता आणि सुशांतचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. एका कार्यक्रमात सुशांतने डिसेंबरमध्ये अंकितासोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. 

डिसेंबरमध्ये सुशांत-अंकिता करणार होते लग्न?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना असून यात एका कार्यक्रमामध्ये अंकिता-सुशांतला लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. यावर सुशांतने डिसेंबरमध्येच लग्न करणार असं सांगितलेलं.

"लग्न कधी करणार?" असा प्रश्न विचारल्यानंतर "गुग्गु हे बघ ना, हे लोक पुन्हा तोच प्रश्न विचारतायेत", असं लडिवाळपणे अंकिता सुशांतला म्हणाली. त्यावर, "लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. येत्या डिसेंबर २०१६ मध्ये आम्ही लग्न करु असं सुशांत सांगतो". परंतु, डिसेंबर २०१६ मध्ये लग्न करण्याऐवजी या दोघांच्या ब्रेकअपचं वृत्त समोर आलं.

राजस्थानी स्टाइलमध्ये अंकिताला करायचं होतं लग्न?

अन्य एका मुलाखतीमध्येही सुशांतने अंकितासोबत लग्न करण्याविषयी भाष्य केलं होतं. अंकिताला राजस्थानी स्टाइलमध्ये मोठ्या थाटात लग्न करायचं आहे असं तो म्हणाला होता.

दरम्यान, सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता फार ढासळून गेली होती. ब्रेकअपनंतर जवळपास २ वर्ष तिने कलाविश्वापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने अनेक मोठे प्रोजेक्ट्सही नाकारले होते. परंतु, काही वर्षांनंतर २०१८ मध्ये तिच्या आयुष्यात  विकी जैन आला आणि डिसेंबर २०२१ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली. 

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूतबॉलिवूडसेलिब्रिटीटेलिव्हिजन